मुंबई : युरोपमधील विमान निर्मिती कंपनी एअरबसने भारतातील चार कंपन्यांशी विमानांच्या सुट्या भागांच्या उत्पादनासाठी करार केले आहेत. त्यात महिंद्रा एरोस्पेससह एकस, डायनामॅटिक टेक्नॉलॉजीज आणि गार्डनर एरोस्पेस या कंपन्यांच्या समावेश आहे.

भारतातील चार कंपन्यांशी ‘मेक इन इंडिया’ उद्दिष्टाला साजेसा करार करण्यात आल्याची घोषणा एअरबसने सोमवारी केली. एअरबसच्या ए३२० निओ, ए ३३० निओ आणि ए ३५० या प्रकारच्या विमानांच्या सुट्या भागांचे उत्पादन या कंपन्या करणार आहेत. या कंपन्यांकडून एअरबसला विमानाच्या बाह्य भाग आणि पंख्याचे भाग यांचा पुरवठा होणार आहे. एअरबसने या आधीच वर्षाच्या सुरुवातीला, ए ३२० निओ प्रकारच्या विमानांच्या दरवाजाच्या उत्पादनासाठी टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स कंपनीशी करार केला आहे.

आणखी वाचा-विकासदर ६.२ टक्के राहील; ‘फिच’चा सुधारीत अंदाज

एअरबस कंपनी भारतातून दरवर्षी ७५ कोटी डॉलरची सुट्या भागांची खरेदी आणि सेवा घेते. आता झालेल्या नवीन करारांमुळे यात मोठी भर पडणार आहे. सध्या एअरबस कंपनीमुळे भारतात १० हजार रोजगारांना पाठबळ मिळत आहे. आता ही संख्या १५ हजारांवर जाण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एअरबसच्या धोरणातील मुख्य भाग हा ‘मेक इन इंडिया’शी जुळवून घेण्याचा आहे. भारतातील एकात्मिक औद्योगिक वातावरणाला गती देण्यास आमचा हातभार लागत आहे, याबद्दल आम्हाला अभिमान आहे. यातून भारत विमान उत्पादन करणाऱ्या देशांमध्ये आघाडीवर जाईल. -रेमी मैलार्ड, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एअरबस इंडिया