अ‍ॅमेझॉनने आता आपल्या संगीत (Music) विभागातील कर्मचार्‍यांना काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. खरं तर मागील वर्षात अ‍ॅमेझॉनने २७ हजारांहून अधिक कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले होते आणि आता अजून कर्मचाऱ्यांना काढत आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, बुधवारी अॅमेझॉनकडून नोकर कपातीची घोषणा करण्यात आली आणि लॅटिन अमेरिका, उत्तर अमेरिका आणि युरोपमधील कर्मचाऱ्यांवर त्याचा परिणाम झाला.

बिझनेस टुडेच्या रिपोर्टमध्ये अ‍ॅमेझॉनच्या प्रवक्त्याने नोकर कपातीची खातरजमा केली आहे. परंतु प्रभावित कर्मचार्‍यांची नेमकी संख्या उघड केलेली नाही. “आम्ही आमच्या संस्थात्मक गरजांचे बारकाईने निरीक्षण करीत आहोत आणि ग्राहकांसाठी आणि आमच्या व्यवसायांच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देत आहोत,” असेही अॅमेझॉन कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. “अ‍ॅमेझॉन म्युझिक टीममधील काही जणांना काढून टाकण्यात आले आहे. आम्ही Amazon Music मध्ये गुंतवणूक करीत राहू,” असंही प्रवक्त्याने सांगितलं.

हेही वाचाः रिलायन्स इंडस्ट्रीज करणार देशातील सर्वात मोठी बाँड विक्री, २० हजार कोटी रुपये जमवणार

कंपनीच्या सर्वात मोठ्या कर्मचारी केंद्रांपैकी वॉशिंग्टन, कॅलिफोर्निया किंवा न्यू यॉर्कमध्ये अलीकडील कोणत्याही ऑफिसमध्ये नोकर कपात होणार नाही. अ‍ॅमेझॉनने तिसर्‍या तिमाहीतील निव्वळ उत्पन्नाचा रिपोर्टमध्ये चांगला फायदा दिसून आला आहे. वर्षाच्या शेवटच्या तिमाहीसाठी अंदाजे महसूल अपेक्षित असून, सुट्टीच्या खरेदी हंगामामुळे अॅमेझॉनसाठी चौथा तिमाहीसुद्धा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

हेही वाचाः टाटांची व्होल्टास विकली जाणार का? आता कंपनीनंच दिलं स्पष्टीकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अ‍ॅमेझॉनने गेल्या महिन्यात त्याच्या स्टुडिओ, व्हिडीओ आणि म्युझिक विभागांमधील कम्युनिकेशनमधील कर्मचार्‍यांसह अनेकांना नोकरीवरून काढण्याची घोषणा केली होती. अ‍ॅमेझॉन म्युझिक, जे पॉडकास्ट देखील ऑफर करते, स्पॉटिफाई, यूट्यूब म्युझिक आणि ऍपल म्युझिकशी स्पर्धा करते आणि अमर्यादित संगीत प्रवाह सेवा प्रदान करते, आता त्या विभागातील कर्मचाऱ्यांवर नोकर कपातीची टांगती तलवार आहे.