मारुती सुझुकी इंडिया आर्थिक वर्ष २०३०-३१ पर्यंत वार्षिक उत्पादन क्षमता ४० लाख वाहनांपर्यंत वाढवण्याच्या दृष्टीने गुजरातमध्ये दुसरा उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी ३५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करेल, असे सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष तोशिहिरो सुझुकी यांनी बुधवारी सांगितले. सुझुकी मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष तोशिहिरो सुझुकी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट २०२४ मध्ये ही घोषणा केली.
व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट २०२४ मध्ये मुकेश अंबानी, गौतम अदाणीसह अनेक उद्योगपतींनी उपस्थिती लावली होती. अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांनी बुधवारी गुजरातमध्ये २ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली.

हेही वाचाः “गुजराती असल्याचा अभिमान, ‘रिलायन्स’ ही गुजराती कंपनी”; मुकेश अंबानींचे वक्तव्य, म्हणाले, “हरित ऊर्जेत…”

अदाणी समूह कच्छमध्ये ३० गिगावॉट क्षमतेचा भव्य ग्रीन एनर्जी पार्क बांधणार आहे. हा प्रकल्प २५ चौरस किलोमीटर परिसर व्यापेल आणि अंतराळातून देखील दृष्टीस पडेल इतकी त्याची भव्यता असेल. अदाणी समूहाच्या गुंतवणुकीमुळे सुमारे १ लाख रोजगार निर्माण होतील. अदाणी समूहाने मागील परिषदेदरम्यान ५५,००० कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. त्यापैकी ५०,००० कोटी रुपये विविध प्रकल्पांवर खर्च केल्याचा समूहाचा दावा आहे. दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीज वर्ष २०३० पर्यंत अक्षय्य ऊर्जेच्या माध्यमातून गुजरातच्या एकूण उर्जेच्या निम्म्या गरजा पूर्ण करण्यास मदत करेल, असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले.

हेही वाचाः ”मग महाराष्ट्रात तुम्ही आलात कशाला? बोऱ्याबिस्तारा गुंडाळा अन् गुजरातला जा,” अंबानींच्या ‘त्या’ वक्तव्यावर मनसेकडून संताप व्यक्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुजरातला हरित ऊर्जा क्षेत्रात अग्रेसर बनवण्यासाठी रिलायन्सने जामनगरमध्ये ५,००० एकरमध्ये ‘धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गिगा संकुल’ बांधण्यास सुरुवात केली आहे. रिलायन्सने गेल्या १० वर्षांत संपूर्ण देशात १५० अब्ज डॉलरची म्हणजेच १२ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली, यातील एक तृतीयांशहून अधिक गुंतवणूक गुजरातमध्ये झाली आहे.पर्यावरणपूरक उत्पादने आणि सामग्रीचा गुजरात हे प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार राज्य बनेल, असंही मुकेश अंबानींनी अधोरेखित केलं आहे.