लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

डिस्प्ले तंत्रज्ञानातील जागतिक अग्रणी कंपनी ‘बेन्क्यू’ने घरात सिनेमागृहापेक्षा सरस मनोरंजनाचा अनुभव देणारे ४ के अल्ट्रा-एचडी चित्र सुस्पष्टतेचे वैशिष्ट्य असलेले ‘डब्ल्यू ५८०० होम सिनेमा प्रोजेक्टर’ प्रस्तुत केले असून, बाजारपेठेच्या या विभागातून मागणीत ५० टक्के वाढीची, तर कंपनीच्या देशभरातील व्यवसायात ३० टक्के दराने वाढ साधण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आशिया-प्रशांत क्षेत्रातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या भारतात प्रोजेक्टरसाठी निर्मिती प्रकल्प थाटण्याचीही कंपनीची योजना आहे.

dharavi, dharavi redevelopment project, 100 teams
धारावी पुनर्विकास प्रकल्प : महिन्याभरात सुमारे एक हजार बांधकामांचे सर्वेक्षण; सर्वेक्षणासाठी १०० पथके तैनात करणार
easy trip planners limited, company share, stock market, share market, portfolio, share market portfolio, stock market portfolio, easemytrip, trip planning company, holiday planning company, holiday packages, trip planning service, airline ticket service, finance article,
माझा पोर्टफोलियो : प्रवास सोपा नाही म्हणून!
Vartaknagar Police Colony
प्रकल्प खर्च वसुलीसाठी गृहबांधणीऐवजी भूखंडविक्री, वर्तकनगर पोलीस वसाहत पुनर्विकास; ४०० कोटी अपेक्षित
8 point 85 percent interest rate on fixed deposits by Bajaj Finance
बजाज फायनान्सतर्फे मुदत ठेवींवर ८.८५ टक्के व्याजदर

देशात आकांक्षावान आणि उच्च-धनसंपदा असलेल्या वर्गाच्या पसंतीक्रमानुरूप विशिष्ट वस्तूंची बाजारपेठ तीव्र वेगाने विकसित होत असून, त्यात होम सिनेमा प्रोजेक्टरचाही समावेश होतो, असे बेन्क्यू इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजीव सिंग म्हणाले. कंपनीच्या उत्पादनांना व्यापार ते व्यापार (बी२बी) क्षेत्रापेक्षा गृह विभागात मागणी वेगाने वाढत आहे. ओटीटी मनोरंजन मंच आणि त्यांची उच्च गुणवत्तेची कटेंट निर्मिती, ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी आणि वाढत्या आकांक्षा या घटकांमुळे घरातील मनोरंजनासाठी लोकांचा ४ के प्रोजेक्टरमधील रस वाढला आहे. नवीन ‘डब्ल्यू ५८००’ प्रोजेक्टर हे ४ के गुणवत्तेचे प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर पाहण्याचा आनंद मिळवून देतात. वापरातील सुलभतेमुळे आणि परवडणाऱ्या किमतीमुळे ते लोकप्रिय बनतील, असा सिंग यांनी विश्वास व्यक्त केला.

शाळा, महाविद्यालये, कंपन्या, कार्यालये, परिषद सभागृहातील इंटरॲक्टिव्ह फ्लॅट पॅनल्स आणि गृह विभागासाठी प्रोजेक्टर अशा बाजाराच्या विविध विभागांना लक्ष्यित दृष्टिकोनामुळे बेन्क्यूच्या व्यवसायाने प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत लक्षणीय वाढ दर्शविली आहे, अशी पुस्तीही सिंग यांनी जोडली.