मुंबई : टाटा समूहातील आघाडीची तंत्रज्ञान कंपनी असणाऱ्या ‘टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड’ने गुरुवारी भांडवली बाजारात स्वप्नवत पदार्पण केले आणि समभाग इश्यू किमतीच्या तुलनेत १४० टक्क्यांच्या प्रचंड अधिमूल्यासह सूचिबद्ध झाला. भांडवली बाजारातील मुख्य बाजारमंचावर नोव्हेंबर २०२१ नंतर प्रथमच मोठ्या दणक्यात स्वागत झाले.

‘टाटा टेक’च्या समभागाने राष्ट्रीय शेअर बाजारात १,२०० रुपयांच्या किमतीवर व्यवहार सुरू केले. समभाग मिळविण्यास यशस्वी ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्याने दिवसअखेरपर्यंत १८० टक्क्यांचा लाभही दाखविला. सत्रातील व्यवहारात तो १,४०० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर झेपावला. तर त्याने १,२०० रुपये हा दिवसाचा तळही गाठला. दिवसअखेर समभाग १६२.६ टक्क्य़ांनी म्हणजेच ८१३ रुपयांनी उंचावत १३१३ रुपयांवर स्थिरावला. दिवसअखेर ‘टाटा टेक’चे बाजारभांडवल ५३,२६४ कोटी रुपयांवर पोहोचले.

717 crores tax due to 76 thousand property owners Notices from the Municipal Corporation
पिंपरी : ७६ हजार मालमत्ताधारकांकडे ७१७ कोटींचा कर थकीत; महापालिकेकडून नोटिसा
400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
Tejasvi Surya files nominations papers
पाच वर्षांत संपत्ती १३ लाखांवरून ४ कोटी; कोण आहेत भाजपाचे तेजस्वी सूर्या?
HDFC Bank shares up 3 percent on rise in deposits loans
ठेवी, कर्जातील वाढीने एचडीएफसी बँक समभागाची ३ टक्क्यांनी झेप

‘टाटा टेक’चा ‘आयपीओ’ २२ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबरदरम्यान गुंतवणुकीस खुला होता. प्रत्येकी ४७५ ते ५०० रुपये किमतीला झालेल्या या भागविक्रीला गुंतवणूकदारांनी ७० पटीने अधिक भरणा करून उमदा प्रतिसाद दिला होता. तर ‘टाटा टेक’च्या या ३०३४ कोटी रुपयांच्या आयपीओसाठी ७३.५८ लाख अर्जांचा पाऊस पडला होता.

‘गांधार ऑइल’चेही शानदार आगमन; ‘फेडफिना’कडून निराशा

गांधार ऑइल रिफायनरी इंडियाने देखील ७६ टक्के अधिमूल्यासह भांडवली बाजारात पाऊल ठेवले. गुंतवणूकदारांनी आयपीओच्या माध्यमातून १६९ रुपयांना मिळवलेला समभाग २९८ रुपयांवर सूचिबद्ध झाला. दिवसभरातील सत्रात तो ३४४.०५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. तर दिवसअखेर तो ७८.३४ टक्के म्हणजेच १३२.४० रुपयांच्या वाढीसह ३०१.४० रुपयांवर बंद झाला. याबरोबरच भांडवली बाजारात पहिल्यांदा पदार्पण करणाऱ्या फेडबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या (फेडफिना) समभागांनी मात्र गुंतवणूकदारांची निराशा केली. ‘फेडफिना’चा समभाग सुमारे १.४२ टक्क्यांच्या सवलतीसह १३८ रुपयांवर सूचिबद्ध झाला. गुंतवणूकदारांनी आयपीओच्या माध्यमातून प्रत्येकी १४० रुपयांना हा समभाग मिळविला होता. दिवसअखेर समभाग ०.१८ टक्क्यांच्या वाढीसह १४०.२५ रुपयांवर स्थिरावला. दिवसभरातील सत्रात त्याने १४८.२५ रुपयांची उच्चांकी तर १३३ रुपयांची नीचांकी पातळी गाठली.