नवी दिल्ली : शिक्षण तंत्रज्ञान क्षेत्रातील बायजू कंपनीने देशभरात २९२ शिकवणी केंद्रांपैकी ३० शिकवणी केंद्रे बंद केली आहे. बायजूची पालक कंपनी थिंक अँड लर्नने ही माहिती दिली आहे. बायजूने खर्चात कपात करण्यासाठी पावले उचलली आहेत. शिकवणी केंद्रे त्यांच्या तिसऱ्या वर्षांत नफा मिळवणारी बनावीत हा कंपनीचा उद्देश आहे. कंपनीने म्हटले आहे, शिकवणी केंद्रांतील शिक्षकांची समर्पित वृत्ती आणि विद्यार्थ्यांची कामगिरीबद्दल आम्हाला अभिमान आहे.

हेही वाचा >>> भारती हेक्साकॉमची ३ एप्रिलपासून प्रारंभिक समभाग विक्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमच्याकडून गुणवत्तेसोबत कार्यक्षमतेवर भर दिला जात असून, बहुतांश केंद्रे तिसऱ्या वर्षात नफा मिळविणारी होण्यास यामुळे मदत होईल. कंपनीची ९० टक्के म्हणजेच २९२ पैकी २६२ केंद्रे संमिश्र पद्धतीने सुरू राहतील. आगामी काही वर्षांत त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. बायजूची शिकवणी केंद्रे आता तिसऱ्या वर्षात प्रवेश करीत आहेत. याचबरोबर या केंद्रांचा वापर कंपनीकडून विक्री केंद्र म्हणूनही केला जात आहे. कार्यान्वयन कार्यक्षमता वाढविण्याचा कंपनी प्रयत्न करीत आहे. पुढील शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ साठी सध्याच्या बहुतांश विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचेही कंपनीने नमूद केले आहे.