कोलकता : बँकांच्या कर्ज वितरणाचे प्रमाण यंदा सकारात्मक राहणार असून ठेवींमध्येही वाढ होणार आहे, असा अंदाज केअरएज रेटिंग्ज या पतमानांकन संस्थेने अहवालात वर्तविला आहे. जानेवारीच्या पहिल्या पंधरवडाअखेरीस कर्जवितरण १५९.७ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

बँकांचे कर्ज वितरण २०२४ मध्ये वाढत जाणार आहे. यंदा १४ जानेवारीपर्यंत पहिल्या पंधरवड्यात कर्ज वितरण १५९.७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात २०.३ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. एचडीएफसी लिमिटेडचे एचडीएफसी बँकेत विलीनीकरण झाल्याने वैयक्तिक कर्जांमध्ये वाढ झाल्याने हे प्रमाण वाढले आहे.

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
High Blood Pressure Cases, High Blood Pressure Rising in india, 4 out of 10 Patients Not Checking, Patients Not Checking Regularly, high blood pressure unhealthy lifestyle, smoking,
१० पैकी ४ रूग्णांची उच्च रक्तदाब तपासणी करण्यास टाळाटाळ! अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे हृदयविकार व स्ट्रोकचा धोका…
What are the reasons for increase in average life expectancy of Indians
भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढतेय… कारणे कोणती?

हेही वाचा >>> टाटा मोटर्सपुढे ‘मारुती’ पिछाडीवर; सर्वाधिक बाजार मूल्यांकन असलेल्या वाहन निर्माता कंपनीचा बहुमान

एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणाचा परिणाम वगळता कर्ज वितरणातील वाढ १६.१ टक्के आहे. मागील वर्षी पहिल्या पंधरवड्यात ही वाढ १६.५ टक्के होती. ठेवींमध्ये यंदा पहिल्या पंधरवड्यात १३.१ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. या वर्षात ठेवींमधील वाढीचा दर सुधारण्याचा अंदाज आहे, असे अहवालात म्हटले आहे.

चालू वर्षात कर्ज वितरणातील वाढ सकारात्मक असेल. आर्थिक सक्रियता आणि वाढत्या डिजिटलायजेशनमुळे किरकोळ कर्जांमध्ये होणारी वाढ याला कारणीभूत ठरेल. ज्यादा व्याजदर, महागाई आणि जागतिक पातळीवरील अनिश्चितता यांचा परिणाम कर्जाच्या वाढीवर होईल. कर्ज आणि ठेवींचे गुणोत्तर सप्टेंबर २०२३ पासून ८० टक्क्यांच्या खाली राहिले आहे. त्यात यंदा पहिल्या पंधरवड्यात ४४ आधारबिंदूंनी वाढ होऊन हे गुणोत्तर ७९.९ टक्क्यांवर पोहोचले आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.