मुंबई : केंद्र सरकारच्या सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेत १६ ऑक्टोबर २०१७ मध्ये गुंतविलेल्या रोख्यांचे मुदतपूर्व विमोचन (रिडम्प्शन) करायचे झाल्यास, रिझर्व्ह बँकेने ९,२२१ रुपये प्रतिग्रॅम असा दर निश्चित केल्याचे रविवारी जाहीर केले. आठ वर्षांपूर्वी रोख्यांच्या खरेदी किमतीच्या तुलनेत हा दर २११.१ टक्के अधिक आहे.

सुवर्ण रोख्यांचा विमोचन दर हा सरलेल्या ९ एप्रिल ते १५ एप्रिल २०२५ या दिवसाअंती बंद झालेल्या सोन्याच्या किमतीच्या सरासरीच्या आधारावर निश्चित केला गेला आहे. भारतीयांमधील धातूरूपी सोन्याचे आकर्षण पाहता त्याला पर्याय या रूपाने आणि सोन्याच्या आयातीवर खर्च होणाऱ्या परदेशी चलनात कपात व्हावी, या उद्देशाने १४ जानेवारी २०१६ रोजी सार्वभौम सुवर्ण रोखे योजना सुरू करण्यात आली होती. आठ वर्षांपूर्वी २,९६४ रुपये प्रतिग्रॅमप्रमाणे सुवर्ण रोख्यांची विक्री झाली होती. त्या तुलनेत विमोचनासाठी निर्धारित ९,२२१ रुपये प्रतिग्रॅम हा दर २११.१ टक्के परतावा मिळवून देणारा आहे. या रोख्यांचा मुदत कालावधी हा आठ वर्षांचा आहे. सध्या जागतिक पातळीवर वाढलेले सोन्याचे दर आणि वाढत्या अस्थिरतेमुळे केंद्र सरकारने सार्वभौम सुवर्ण रोखे योजना थांबवली आहे.

२०१७ मधील खरेदी किंमत – २,९६४ रुपये प्रतिग्रॅम

विमोचन किंमत (एप्रिल २०२५) ९,२२१ रुपये प्रतिग्रॅम

प्रतिग्रॅम नफा – ६,२५७ रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकूण परतावा (%) – २११.१