कोल्ड ड्रिंक बनवणारी कोका-कोला ऑनलाइन फूड ऑर्डरिंग प्लॅटफॉर्म Thrive मध्ये भागभांडवल विकत घेणार आहे. Thrive हे फूड सर्च आणि डिलिव्हरी प्लॅटफॉर्म आहे, ज्यात ५,५०० हून अधिक रेस्टॉरंट्ससह भागीदारी आहेत आणि स्विगी आणि झोमॅटोशी थेट स्पर्धा करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतातील स्टार्टअपमध्ये कोका-कोलाची ही पहिली गुंतवणूक असेल, परंतु अद्याप त्याच्या डीलबद्दल कोणतीही खात्रीशीर आकडेवारी प्राप्त झालेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याशिवाय ही गुंतवणूक कोका-कोला कंपनीला त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. कारण ते ग्राहकांना फक्त कोका-कोलाचे कोल्ड ड्रिंक उत्पादने तसेच Thrive अॅपवर केलेल्या खाद्यपदार्थांची ऑर्डर देण्यास प्रोत्साहित करतील. हे त्यांना ऑर्डर, पॅकेज डील आणि खाद्यपदार्थ विकण्यास सानुकूलित करण्यात मदत करतील. २०२१ च्या शेवटी Domino’s चे ऑपरेटर Jubilant Foodworks ने Thrive मधील ३५% स्टेक सुमारे २४.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. त्यानंतर ग्राहकांना थेट डिलिव्हरी करण्यास तसेच ग्राहकांच्या डेटामध्ये प्रवेश देण्यास मदत होईल, असे म्हटले जात होते.

हेही वाचाः SBI कडून ‘अमृत कलश स्पेशल’ FD पुन्हा लाँच, योजनेत मिळतेय जबरदस्त व्याज

आतापर्यंत कोका-कोला हे पॅक केलेले कोक आणि थम्स अप एरेटेड पेये, मिनिट मेड ज्यूस, जॉर्जिया कॉफी आणि किनले वॉटर विकते. त्यांनी फक्त कोका-कोला कोल्ड्रिंक्स विकणाऱ्या मॅकडोनाल्ड या एकमेव फास्ट फूड चेनसोबत जागतिक भागीदारी केली आहे. कोका-कोला इंडियाने यावर भाष्य करण्यास नकार दिला. Thrive Now चालवणाऱ्या हॅशटॅग लॉयल्टीचे सह-संस्थापक ध्रुव दिवाण यांनीही यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

कंपनी एक मोठी संधी पाहत आहे

ग्राहकांना रेस्टॉरंट्समधून खाद्यपदार्थ तसेच पेये ऑर्डर करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी कोका-कोलाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये भारतात कोक इज कुकिंग नावाचे जागतिक खाद्य व्यासपीठ लाँच केले. त्यावेळी कोका-कोला कंपनीचे भारत आणि दक्षिण पश्चिम आशियातील उपाध्यक्ष आणि मार्केटिंग हेड अर्णब रॉय यांनी सांगितले होते की, कंपनीला भारतात खाद्यपदार्थांबरोबर कोल्ड ड्रिंकचा वापर वाढवण्याची मोठी संधी दिसत आहे.

हेही वाचाः भारत लवकरच इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्र बनणार, वेदांताने २० कोरियन डिस्प्ले कंपन्यांशी केला करार

Zomato आणि Swiggy करतात १८-२५% शुल्क आकारतात

Thrive कडे सेल्फ-सर्व्ह टूलदेखील आहे, जे रेस्टॉरंटना त्यांच्या प्लॅटफॉर्मवर त्यांचे स्वतःचे उप-पोर्टल तयार करण्याचा पर्याय देते, जेणेकरून ते ग्राहकांकडून थेट ऑनलाइन ऑर्डर प्राप्त करू शकतील. Zomato आणि Swiggy कडून १८-२५% शुल्क आकारले जाते, त्या तुलनेत ते रेस्टॉरंट्सकडून एक चतुर्थांश कमिशन आकारत असल्याने या प्लॅटफॉर्मला रेस्टॉरंटचा मोठा आधार मिळाला आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coca cola to invest in startup for the first time in india take on swiggy zomato vrd
First published on: 17-04-2023 at 18:38 IST