वृत्तसंस्था, नवी दिल्ली

भारतातील कर शून्यावर आणण्याची माझी झच्छा आहे परंतु, देशासमोरील आव्हाने मोठी आहेत. त्यावर मात करण्यासाठी कर आवश्यक आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी व्यक्त केले.

भोपाळमधील इंडियन इन्सिट्यूट ऑफ एज्युकेशन अँड रिसर्चच्या (आयसर) दीक्षांत समारंभात सीतारामन बोलत होत्या. ऊर्जा स्थित्यंतराचे उद्दिष्ट गाठण्यासाठी भारत स्वत:चे पैसे खर्च करीत आहे. जगाकडून अद्याप यासाठी जाहीर झालेला निधी मिळालेला नाही. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर सीतारामन म्हणाल्या की, बाहेरून येणाऱ्या पैशाची प्रतीक्षा करणे हे भारताला परवडणारे नाही. त्यामुळे भारताना प्रतीक्षा न करता पॅरिसमध्ये दिलेले आश्वासन आपल्याचा पैशाने पूर्ण करण्याचे पाऊल उचलले.

हेही वाचा >>>येस बँकेतील हिस्सेदारी स्टेट बँक विकणार? मार्चपर्यंत १८,४०० कोटी मूल्याची भागधारणा निकाली काढण्याचे लक्ष्य

अनेक वेळा मला अर्थमंत्री काम करताना प्रेरणादायी वाटत नाही. याला कारण म्हणजे आमच्यावर हा कर का, या लोकांच्या प्रश्नांची उत्तरे मला द्यावी लागतात. हा कर आणखी कमी होणार नाही का, अशीही विचारणा केली जाते. अर्थमंत्री म्हणून माझी भूमिका महसूल निर्माण करण्याची असली तरी जनतेला त्रास देण्याची नाही, असे सीतारामन यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशाची वाटचाल विकसित भारताकडे व्हावी, यासाठी आयसरच्या विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण मार्ग शोधून मदत करावी. याचबरोबर हवामान बदलाबाबत तातडीच्या उपाययोजनाही विद्यार्थ्यांनी शोधायला हव्यात.- निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री