भारताच्या राजधानीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे विमानतळ आहे. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड हे जीएमआर विमानतळांद्वारे चालवले जाते, त्यात एडीपी ग्रुपची गुंतवणूक आहे. परंतु दिल्लीच्या वातावरणातील कमी दृश्यमानतेमुळे दिल्ली विमानतळाला तोटा सहन करावा लागत आहे.
विमानतळाने ऑक्टोबर ते डिसेंबर या आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत १३२२.९ कोटी रुपयांच्या एकूण उत्पन्नावर १२७.७ कोटी रुपयांचा तोटा जाहीर केला, ४०९.९ कोटी रुपयांचा ऑपरेटिंग नफा नोंदवला, परंतु उच्च वित्त आणि घसारा खर्चामुळे हा तोटा सहन करावा लागला. कमाईचा बिगर एअरो महसूल हा ७५९.७ कोटी रुपये होता. गेल्या तिमाहीत विमानतळाच्या एकूण उत्पन्नाच्या तो ५७.४ टक्के आहे. महसूल मागील तिमाहीपेक्षा ८ टक्के जास्त आहे आणि आर्थिक वर्ष २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीत महसूल १२.५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. विमानतळाच्या हवाई उत्पन्नाच्या २.८ पट वाटा हा बिगर एअरो महसुलाचा आहे, जो विमानतळातील मॉल संकल्पनेतून येतो.
हेही वाचाः सेन्सेक्स १४०० अंकांनी वधारला, निफ्टीने २२,१२५ चा टप्पा ओलांडला
एअरोचा महसूल अनुक्रमे ७.२ टक्क्यांनी वाढून २६९.९ कोटी रुपये झाला. एअरो कमाईमध्ये सामान्यत: एअरलाइन टर्मिनल स्पेस भाडे, एअरलाइन लँडिंग फी आणि टर्मिनल, गेट्स, सेवा आणि युजर्स विकास शुल्कासाठीचे वापर शुल्क समाविष्ट असते. बिगर एअरबोर्न कमाईमध्ये भाडे, किरकोळ, अन्न आणि पेये, शुल्क मुक्त दुकाने, जाहिराती आणि कार पार्क यांचा समावेश होतो. दिल्ली विमानतळावरील हवाई वाहतूक दरवर्षी ८.५ टक्के वाढली आणि १८.८ दशलक्ष प्रवासी पोहोचले. प्रवासी वाहतूक वाढल्याने किरकोळ खाद्यपदार्थ आणि पेये यांच्यावरील खर्चात वाढ झाली. किरकोळ आणि शुल्कमुक्त विभागासह बिगर एअरो महसूल दरवर्षी १३ टक्के वाढला आहे, ज्यात दरवर्षी ११ टक्के वाढ नोंदवण्यात आली.
हेही वाचाः Meta Dividend : फेसबुक पहिल्यांदाच देणार लाभांश, मार्क झुकरबर्गला मिळणार ७०० मिलियन डॉलर्स
विमानतळाला एअरोसिटीच्या भाड्यांमधूनही महसूल मिळतो, जो गेल्या तिमाहीत ३९ टक्क्यांनी वाढून १९५.६ कोटी रुपये झाला आहे. डिसेंबरमध्ये संपलेल्या नऊ महिन्यांसाठी दिल्लीने २१.७ अब्ज रुपयांचा बिगर एअरो महसूल नोंदवला आणि त्यापैकी २८ टक्के किरकोळ आणि १९ टक्के जागा भाड्याने देऊन मिळवला. दीड अब्ज रुपयांहून अधिक रक्कम जाहिरातीतून आली. डिसेंबर २०२३ ला संपलेल्या नऊ महिन्यांसाठी प्रति प्रवासी शुल्कमुक्त खर्च रुपये १००५ होता. दिल्ली आणि हैदराबाद विमानतळांसाठी प्रति प्रवासी बिगर एअर महसूल २६० रुपये होता.