वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सरलेल्या एप्रिल महिन्यात केवळ १६ लाख नवीन डिमॅट खाती उघडली गेली असून, डिमॅट खाते उघडण्याचे हे प्रमाण दोन वर्षांतील नीचांकाला म्हणजेच डिसेंबर २०२०च्या पातळीवर घसरल्याचे दिसून येत आहे. बाजारातील विद्यमान अस्थिरता नवीन गुंतवणूकदारांना प्रवेशापासून परावृत्त करीत असल्याचे चित्र आहे.

11th class, seats vacant,
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात जागा रिक्त राहिल्याचे उघडकीस, झाले काय?
Retail inflation hit a five month low of 4.85 percent in March
किरकोळ महागाई दर ४.८५ टक्के; पाच महिन्यांच्या नीचांकी घसरण
12 different products in maharastra received gi tags
तुळजापूरच्या कवड्याच्या माळेसह कोणत्या उत्पादनांना मिळाले जीआय मानांकन? जाणून घ्या सविस्तर…
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये महिन्याला सरासरी २०.९ लाख, तर २०२१-२२ या करोनाच्या छायेतील काळात महिन्याला सरासरी २९ लाख नवीन डिमॅट खात्यांची भर पडत आली आहे. त्यातुलनेत सरलेल्या एप्रिल महिन्यातील नवीन खात्यांची संख्या लक्षणीय घटली आहे.भांडवली बाजार विश्लेषकांच्या मते, गेल्या १८ महिन्यांच्या कालावधीत भांडवली बाजारातील अस्थिर वातावरण, आकर्षक किमतीच्या मोठ्या प्रारंभिक समभाग विक्रीचा अभाव आणि विशेषत: स्मॉल आणि मिड-कॅप क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांनी अल्प परतावा दिल्याने गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडे पाठ फिरवली आहे, असे सांगितले जात आहे. सप्टेंबर २०२१ ते मार्च २०२३ दरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टी अनुक्रमे ०.२३ टक्के आणि १.५ टक्क्यांनी घसरले, तर बीएसई मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक या कालावधीत प्रत्येकी ४ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.

हेही वाचा >>>Gold-Silver Price on 6 May 2023: ग्राहकांनो अशी संधी पुन्हा नाही; सोन्या-चांदीच्या दरात घट, आज किती स्वस्त झालं जाणून घ्या

डिमॅट खात्यांच्या एकूण संख्यने एप्रिल २०२३ अखेर ११ कोटी ६४ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. वार्षिक तुलनेत त्यात २६ टक्के वाढ झाली आहे. तर महिनागणिक वाढ केवळ १.६ टक्क्यांची आहे.मोतीलाल ओसवाल सिक्युरिटीजच्या रणनीतीकार हेमांग जानी यांच्या मते, रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर ६.५० टक्क्यांवर नेल्यामुळे स्थिर परतावा देण्याऱ्या गुंतवणूक साधनांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो आहे. त्या तुलनेत भांडवली बाजारात अनिश्चितता वाढली आहे.

काही विश्लेषकांनी नवीन डिमॅट खाते उघडण्याचे आकर्षण कमी होण्यामागे माहिती-तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील सध्याच्या मरगळीलाही जबाबदार धरले आहे. नवीन खाते उघडण्यात ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे योगदान देणारे आयटी क्षेत्र सध्या गंभीर अनिश्चिततेच्या गर्तेत आहे. त्या क्षेत्रातील कंपन्यांची घटलेली कमाई आणि त्या परिणामी खर्च कमी करण्यासाठी वेतन कपात आणि नोकर कपातीचे पाऊल उचलले आहे. बहुतांश नवगुंतवणूकदार देखील बाजारातून बाहेर पडले आहेत. दुसरीकडे म्युच्युअल फंडातील नियोजनबद्ध गुंतवणूक अर्थात ‘एसआयपी’च्या माध्यमातून होणाऱ्या गुंतवणुकीने दरमहा १४,००० कोटींचा टप्पा ओलांडला आहे आणि ही भांडवली बाजारासाठी दिलासादायक बाब आहे.