पीटीआय, नवी दिल्ली

खाणकाम क्षेत्रातील वेदान्त लिमिटेडने शुक्रवारी पोलाद, तेल आणि वायू, वीज आणि स्टील या पाच प्रमुख व्यवसायांचे विलगीकरण करून, त्या प्रत्येक व्यवसायासाठी स्वतंत्र कंपनी निर्माण करून ती सूचिबद्ध करण्याची घोषणा केली. या योजनेच्या अंमलबजावणीनंतर वेदान्त समूहाच्या सहा सूचिबद्ध कंपन्या भांडवली बाजारात असतील. भागधारकांच्या गुंतवणुकीचे मूल्यवर्धन करण्यासाठी आणि व्यवसायानुरूप सुसूत्रीकरणासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले.

Police raid, spa, Hinjewadi,
आयटी हब हिंजवडीत स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; चार महिलांची सुटका, पैशांचे अमिश दाखवून वेश्याव्यवसाय
akiyo morita
चिप-चरित्र: जपानी वर्चस्वाचा प्रारंभ
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
entrepreneur and digital freelancer Saheli Chatterjee
सोशल मीडियावर ११० रुपयांनी सुरू झाली कमाई; आता आहे कोट्यावधींची मालकीण! जाणून घ्या ‘या’ उद्योजिकेचा प्रवास

कंपनीने भांडवली बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, कंपनी सहा स्वतंत्र सूचिबद्ध कंपन्यांची आखणी करत आहे. परिणामी वेदान्तच्या विद्यमान भागधारकांनी धारण केलेल्या प्रत्येक समभागाच्या बदल्यात वेगवेगळ्या पाच कंपन्यांचा प्रत्येकी एक समभाग मिळणार आहे. या प्रक्रियेला मंजुऱ्यांचे सर्व सोपस्कार पूर्ण करण्यासाठी १२ ते १५ महिन्यांचा कालावधी लागणे अपेक्षित आहे.

आणखी वाचा-१ ऑक्टोबरपासून २००० रुपयांच्या नोटेपासून डेबिट अन् क्रेडिट कार्डापर्यंत ‘हे’ ८ नियम बदलणार, सर्वसामान्यांवर थेट परिमाण होणार

खाणकाम क्षेत्रातील वेदान्त जस्त, चांदी, शिसे, ॲल्युमिनियम, क्रोमियम, तांबे, निकेल यांच्या उत्खननांत कार्यरत आहे. याचबरोबर तेल आणि वायू, पोलाद, स्टील, वीज, कोळसा आणि अक्षय्य ऊर्जेसह विविध क्षेत्रात तिचा व्यवसाय विस्तार आहे. कंपनी आता सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले ग्लासच्या निर्मितीमध्ये प्रवेश करत आहे.

कंपन्या विलग झाल्यानंतर, प्रत्येक सूचिबद्ध कंपनीला स्वतंत्र व्यवस्थापन, भांडवल उपलब्ध होईल. शिवाय संभाव्य आणि वास्तविक मूल्यापर्यंत वाढण्याचे अधिक स्वातंत्र्य असेल. प्रत्येक कंपनीची स्वतःची बाजारपेठ, मागणी-पुरवठा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादकता वाढवण्याची क्षमता आहे, असे वेदान्तचे अध्यक्ष अनिल अगरवाल विलगीकरणाच्या योजनेबाबत म्हणाले.

‘वेदान्त’च्या संभाव्य सहा स्वतंत्र सूचिबद्ध कंपन्या

• वेदा्न्त ॲल्युमिनियम

• वेदा्न्त ऑइल ॲण्ड गॅस

• वेदा्न्त पॉवर

• वेदा्न्त स्टील ॲण्ड फेरस मटेरीअल

• वेदान्त बेस मेटल

• वेदान्त लिमिटेड

समभागात ७ टक्क्यांची तेजी

शुक्रवारच्या सत्रात वेदान्तचा समभाग ६.८२ टक्क्यांनी म्हणजेच १४.२० रुपयांनी वधारून २२२.५५ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या कंपनीच्या समभागांच्या बाजारभावानुसार कंपनीचे ८२,७२६ कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.