कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची (EPFO) ई-पासबुक सेवा गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. ईपीएफओच्या वेबसाइटवर लॉग इन केल्यानंतर ई-पासबुक उघडत नाही. उमंग अॅपवरही ई-पासबुक उपलब्ध नसल्यामुळे ग्राहकांना त्यांचा बॅलन्स तपासता येत नाही. तांत्रिक बिघाडामुळे ईपीएफओची ई-पासबुक सेवा बंद पडण्याची या वर्षातील ही दुसरी वेळ आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्स ई-पासबुक सेवा बंद झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

एका यूजरने ट्विटरवर ईपीएफओला पासबुक कधी उपलब्ध होईल, असे विचारले असता, ही समस्या लवकरच दूर होईल, असे ईपीएफओकडून सांगण्यात आले. ईपीएफओच्या अधिकृत ट्विटर हँडलवर लिहिले आहे, “प्रिय सदस्य, गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीम या प्रकरणाचा तपास करीत आहे. कृपया थोडा वेळ थांबा. याआधी जानेवारी महिन्यात अनेक युजर्सनी ई-पासबुक सुविधेचे काम होत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. संस्थेने त्रुटी दूर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर काही दिवसांनी ही सुविधा पुन्हा सुरू करण्यात आली होती. परंतु ती आता पुन्हा ठप्प पडली आहे.

ई-पासबुकचे फायदे

EPFO चे ई-पासबुक नियोक्ता आणि कर्मचारी दोघांनी त्यांच्या EPF आणि कर्मचारी पेन्शन योजना (EPS) खात्यांमध्ये केलेल्या व्यवहारांची माहिती देते. पासबुकमध्ये मासिक योगदानाच्या माहितीसोबतच व्याजाचीही माहिती आहे. मिस्ड कॉल, ईपीएफओ अॅप/उमंग अॅप आणि ईपीएफओ पोर्टलवर एसएमएसद्वारे तुम्ही तुमचा ईपीएफ बॅलन्स तपासू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अशा प्रकारे ऑनलाइन बॅलन्स तपासा

EPFO वेबसाइटद्वारे तुमच्या खात्यातील बॅलन्स जाणून घेण्यासाठी epfindia.gov.in वर EPFO ​​च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या. ई-पासबुकवर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा भरावा लागेल. हे केल्यानंतर तुम्हाला पीएफ खात्याशी संबंधित माहिती दिसू लागेल. येथे तुम्हाला सदस्य आयडी दिसेल. तुम्ही ते निवडल्यास तुम्हाला तुमचा पीएफ बॅलन्स ई-पासबुकवर दिसेल.