५०० रुपयांच्या नोटेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. RBI ने ५०० रुपयांच्या नोटेबाबत नवी माहिती प्रसिद्ध केली आहे. खरं तर स्टार मार्क असलेल्या ५०० च्या काही नोटा बाजारात चलनात येत आहेत. खरं तर सोशल मीडियावर या नोटा बनावट असल्याचं सांगितलं जात आहे. पण आता आरबीआयने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. स्टार मार्क असलेली नोटदेखील खरी आहे आणि व्हायरल पोस्टमध्ये केले जाणारे दावे पूर्णपणे खोटे आहेत, असंही भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. जेव्हापासून सरकारने २००० रुपयांच्या नोटांचे चलन बंद केले आहे, तेव्हापासून ५०० रुपयांच्या नोटांबद्दल अशा अफवा पसरल्या आहेत.

स्टार मार्कच्या नोटा बाजारात आल्यानंतर लोकांमध्ये हा विषय चर्चेचा बनला होता. पण भारतीय रिझर्व्ह बँकेने एक निवेदन जारी करून लोकांचा सर्व संभ्रम दूर केला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यासंदर्भात स्पष्ट केलं आहे.

हेही वाचाः ”भारतात या अन् गुंतवणूक करा,” पंतप्रधान मोदींची जागतिक चिप निर्मात्यांना साद

आरबीआयने नेमके काय सांगितले?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गुरुवारी ५०० रुपयांच्या नोटांबाबत स्पष्टीकरण दिले. स्टार मार्क (*) असलेली बँक नोट पूर्णपणे खरी आहे. १० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंतच्या अशा अनेक नोटा चलनात आहेत, ज्यामध्ये मालिकेच्या मध्यभागी ३ अक्षरांनंतर अ‍ॅस्ट्रिक चिन्ह आहे आणि नंतर उर्वरित अंक लिहिलेले आहेत. आरबीआयचे म्हणणे आहे की, क्रमांकासह केलेले स्टार मार्क सूचित करते की, ती बदललेली किंवा पुनर्मुद्रित केलेली बँक नोट आहे. ही नोट पूर्णपणे खरी आहे.

हेही वाचाः Money Mantra : कर वाचवण्यासाठी पालकांना भाडे देता येते का? नियम काय सांगतो?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्टार मार्कच्या नोटा आधीपासूनच चलनात

आरबीआयने सांगितले की, स्टार मार्क असलेल्या नोटा २००६ पासून चलनात आहेत. या चलनी नोटा २००६ मध्ये बाजारात आल्या होत्या. सुरुवातीला फक्त स्टार मार्क असलेल्या १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटा छापल्या जात होत्या. आता मोठ्या नोटाही छापल्या जात आहेत. जेव्हा जेव्हा अशा चलनी नोटा जारी केल्या जातात, तेव्हा त्यांच्या पॅकेटवर एक पट्टी लावली जाते. छपाईदरम्यान खराब झालेल्या चलनी नोटा बदलण्यासाठी स्टार मार्क असलेल्या नोटा जारी करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात स्टार मार्क असलेल्या नोटांचे पुनर्मुद्रण करण्यात आले आहे. RBI १०० रुपयांच्या नोटांचे बंडल छापते. बंडलमधील काही नोटा बरोबर छापल्या जात नाहीत. त्या नोटा बदलण्यासाठी स्टार मार्क आणण्यात आले आहे. तसेच या नोटांचे मूल्य इतर नोटांसारखेच आहे. जर तुम्हाला कुठेतरी स्टार मार्क असलेली चलनी नोट मिळाली तर घाबरू नका, कारण या नोटा पूर्णपणे सुरक्षित आणि अस्सल आहेत.