१५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारने “हर घर तिरंगा” मोहीम २.० सुरू केली आहे. सर्व नागरिकांना घरी राष्ट्रध्वज फडकावण्यासाठी या माध्यमातून प्रोत्साहित करण्यात येत आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी राज्यातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये २५ रुपये किमतीत राष्ट्रध्वज उपलब्ध करून देण्यात आला आहे.

सर्व सरकारी/खासगी संस्था, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्थांना राष्ट्रध्वज हवे असल्यास १० ऑगस्टपासून टपाल खात्याशी संपर्क साधावा. राष्ट्रध्वजांच्या मोठ्या प्रमाणात विक्रीच्या ऑर्डरसाठी कृपया पणजी मुख्यालय आणि मडगाव मुख्यालयाशी किंवा विपणन कार्यकारी राजेश मडकईकर (संपर्क ९८९०७०१६०१) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन टपाल खात्याने केले आहे.

हेही वाचाः ११२ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात CRCS च्या माध्यमातून आज प्रत्येकी १०००० रुपये जमा, लवकरच सर्व गुंतवणूकदारांना पैसे परत मिळणार

ऑल इंडिया रेडिओ न्यूजच्या अधिकृत ट्विटनुसार, हर घर तिरंगा साजरा करण्यासाठी इंडिया पोस्ट ऑफिस आपल्या १.६० लाख पोस्ट ऑफिसमधून राष्ट्रध्वज विकणार आहे. सरकार १३ ते १५ ऑगस्टदरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवत आहे. विभागाच्या ई-पोस्ट ऑफिस सुविधेद्वारेही नागरिक राष्ट्रध्वज खरेदी करू शकतात.

हेही वाचाः विश्लेषण: ऑइल इंडिया आता ‘महारत्न’, ओएनजीसी विदेशला ‘नवरत्न’चा दर्जा; देशात किती महारत्न, नवरत्न अन् मिनीरत्न?

भारताच्या ध्वजाची किंमत किती ?

तुम्ही राष्ट्रीय ध्वज जवळच्या पोस्ट ऑफिसमधून किंवा ऑनलाइन २५ रुपयांच्या नाममात्र किमतीत खरेदी करू शकता. PIB च्या २ ऑगस्ट २०२३ च्या प्रेस रिलीझनुसार, या मोहिमेमध्ये पोस्ट विभाग ही विक्री आणि वितरण एजन्सी आहे, जी लोकांना जवळजवळ वाजवी दरात राष्ट्रीय ध्वज उपलब्ध करून देते. ज्याची किंमत २५ रुपये ठेवण्यात आली आहे.