तंत्रज्ञान प्रमुख कंपनी फॉक्सकॉनने वेदांतापासून वेगळे झाल्यानंतर भारतात आपले कार्य सुरूच ठेवणार असल्याचे संकेत दिले आहेत. फॉक्सकॉनने भारतात आपले कार्य विस्तारण्यासाठी देशात सेमीकंडक्टर उत्पादन युनिट स्थापन करण्यासाठी स्वतंत्रपणे अर्ज करण्याची तयारी चालवली आहे. फॉक्सकॉन सेमीकंडक्टर्स आणि डिस्प्ले फॅब इकोसिस्टमसाठी सुधारित कार्यक्रमाशी संबंधित अर्ज दाखल करण्याच्या दिशेने काम करीत आहे, आम्ही चांगल्या भागीदारांसाठी सक्रियपणे चाचपणी करीत आहोत,” असंही फॉक्सकॉनने एका निवेदनात म्हटले आहे.

तैवानच्या फॉक्सकॉनने वेदांताबरोबर १९.५ अब्ज डॉलरचा संयुक्त प्रोजेक्ट सोडला आणि दोघांचा करार संपुष्टात आला. त्यानंतर भारताच्या सेमीकंडक्टर कार्यक्रमावर कोणताही परिणाम होणार नाही, असंही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. विशेष म्हणजे संयुक्त उपक्रम संपवण्याचा निर्णय दोन्ही कंपन्यांनी परस्पर संमतीने घेतला असून, दोन्ही कंपन्यांनी आता त्यांचे तंत्रज्ञान भागीदार शोधले आहेत, अशीही माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

खरं तर फॉक्सकॉन आणि वेदांता या दोघांना चिप्स बनवण्याचा कोणताही पूर्वानुभव किंवा तंत्रज्ञान नाही. त्यांना ते तंत्रज्ञान भागीदाराकडून मिळणे अपेक्षित होते.”हे सगळ्यांनाच माहीत आहे की, दोन्ही कंपन्यांना पूर्वीचा सेमीकंडक्टर अनुभव किंवा तंत्रज्ञान नव्हते आणि त्यांनी भागीदाराकडून तंत्रज्ञान घेणे अपेक्षित होते,” असंही केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले. तसेच “फॉक्सकॉन आणि वेदांता हे दोन्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडिया धोरणासाठी आणि भारताच्या सेमीकंडक्टर कार्यक्रमासाठी वचनबद्ध आहेत. फॉक्सकॉनने वेदांतापासून वेगळे होत जेव्हीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा भारताच्या सेमीकंडक्टर कार्यक्रमावर कोणताही परिणाम होणार नाही,” असंही केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.

हेही वाचाः Made In Tata iPhone : टाटा समूह भारतात आयफोन बनवणार; ‘या’ शहरात प्लांट उभारणार

गुजरात १९.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार

वेदांता आणि फॉक्सकॉन यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये गुजरातमध्ये सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स उभारण्यासाठी १९.५ अब्ज डॉलर गुंतवणुकीसाठी करार केला होता. परंतु यंदा मे महिन्यात तंत्रज्ञान भागीदाराबरोबर टाय अप करण्यासाठी संयुक्त उपक्रमासाठी अडचणी आल्या होत्या.

वेदांता आणि फॉक्सकॉन यांनी तंत्रज्ञान परवान्यासाठी STMicro बरोबर करार केला होता, परंतु युरोपियन चिप निर्मात्याने भागीदारीमध्ये जास्त हिस्सा घ्यावा अशी सरकारची इच्छा असल्याचंही न्यूज एजन्सी रॉयटर्सने मे मध्येच वृत्त दिले होते. दुसरीकडे सेबीकडून गेल्या महिन्यात वेदांतला जाहीरपणे नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला होता, ज्याने फॉक्सकॉनबरोबर भारतात अर्धसंवाहक बनवण्यासाठी भागीदारी केली आहे, कारण या करारात वेदांताची होल्डिंग फॉक्सकॉन कंपनीबरोबर होती, असंही एका निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचाः Money Mantra : अवघा एक दिवस शिल्लक; अधिक पेन्शनसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आज संपणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेदांताने काय म्हटले?

आपण सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी वचनबद्ध आहे आणि भारतातील पहिली फाउंड्री उभारण्यासाठी इतर भागीदारांबरोबर तयार आहोत. सेमीकंडक्टरसाठी पंतप्रधान मोदींचे व्हिजन पूर्ण करण्यासाठी दुप्पट प्रयत्न केले आहेत आणि जागतिक सेमीकंडक्टर पुरवठा साखळी पुनर्संचयित करण्यासाठी भारत महत्त्वपूर्ण आहे, याची खातरजमाही केल्याचंही वेदांताने सांगितले आहे.