scorecardresearch

Premium

Black Friday sale: विजय सेल्सपासून ते क्रोमापर्यंत ब्लॅक फ्रायडे सेलला सुरुवात, स्मार्टफोन अन् लॅपटॉपवर जबरदस्त सवलत

विक्री ऑफलाइन स्टोअर्स आणि अधिकृत वेबसाइट दोन्हीवर थेट होणार आहे. सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्टवॉच, लॅपटॉप, टीव्ही, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर्स, ग्रूमिंग गॅझेट्स, हेडफोन्स, उपकरणे आणि इतर अनेक वस्तूंवर उत्तम ऑफर असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Black Friday and Cyber Monday Sale 2023 Offers in Marathi
ब्लॅक फ्रायडे सायबर मंडे सेल ऑफर (फोटो क्रेडिट- जनसत्ता)

Black Friday Sale 2023 : ब्लॅक फ्रायडेची पहिल्यांदा सुरुवात अमेरिकेत झाली असून, त्याला थँक्सगिव्हिंग नंतरचा दिवस म्हणून ओळखले जाते. अमेरिकेत थँक्सगिव्हिंग डे हा मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातो. विशेष म्हणजे अमेरिकेतील हे ब्लॅक फ्रायडेचे फॅड भारतात येऊन पोहोचले आहे. भारतातही विजय सेल्स ते क्रोमापर्यंत भारतीय किरकोळ विक्रेत्यांकडून सर्वोत्तम डील आणि ऑफर केल्या जातात. विजय सेल्स, क्रोमा, अ‍ॅमेझॉन आणि अजिओ यांनी ब्लॅक फ्रायडे सेलची घोषणा केली आहे, ज्या अंतर्गत अनेक प्रसिद्ध उत्पादनांवर चांगल्या डील अन् ऑफर्स दिल्या जात आहेत.

विक्री ऑफलाइन स्टोअर्स आणि अधिकृत वेबसाइट दोन्हीवर थेट होणार आहे. सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्टवॉच, लॅपटॉप, टीव्ही, वॉशिंग मशीन, रेफ्रिजरेटर्स, ग्रूमिंग गॅझेट्स, हेडफोन्स, उपकरणे आणि इतर अनेक वस्तूंवर उत्तम ऑफर असल्याचा दावा करण्यात आला आहे. यंदा Asus ROG Phone 6 वर देखील चांगली सूट मिळत आहे आणि Mivi चे हेडफोनसुद्धा स्वस्त किमतीत खरेदी करता येणार आहेत. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार, काही प्रसिद्ध किरकोळ विक्रेते पादत्राणे, कपडे आणि लॅपटॉप, स्मार्टफोन, स्मार्टवॉच यांसारख्या गॅझेट्सवर उत्तम ऑफर देत आहेत.

विजय सेल्स

विजय सेल्समध्ये २४ नोव्हेंबरपासून ब्लॅक फ्रायडे सेल सुरू झाला असून, २७ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या सेलमध्ये मोबाईल फोन, स्मार्टवॉच, होम अप्लायन्सेस, लॅपटॉप, म्युझिक गॅजेट्स, किचन अप्लायन्सेस, स्वयंपाकाशी संबंधित आवश्यक उपकरणे आणि बऱ्याच उत्पादनांवर आकर्षक सूट दिली जाणार आहे. विशेष म्हणजे Apple आयफोन घेऊ इच्छिणाऱ्यांना HDFC बँक कार्ड आणि इतर एक्सचेंज ऑफरद्वारे ५ हजार रुपयांची त्वरित सवलत देण्यात येणार असून, ७९,९९० पासून सुरू होणारा नवा iPhone १५ घेण्याची संधी मिळणार आहे आहे. तसेच HSBC बँक क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांसाठी किमान २० हजार रुपयांच्या खरेदीवर ७.५ टक्क्यांपासून ७५०० रुपयांपर्यंत त्वरित सवलत दिली जाणार आहे. ICICI बँक क्रेडिट कार्डधारकांना २० हजार रुपयांच्या खरेदीवर ७.५ टक्क्यांपासून ३ हजार रुपयांची सूट दिली जाणार आहे.

mutual fund analysis, Invesco India Large Cap Fund, investment
Money Mantra : फंड विश्लेषण – इव्हेस्को इंडिया लार्ज कॅप फंड
IFS officer Parveen Kaswan collected 2 trucks of plastic with team
दोन ट्रक प्लास्टिक केले जमा! चक्क IFS अधिकाऱ्याने स्वच्छ केले जंगल, व्हिडीओ एकदा पाहाच
Six impressive flagship phones of 2024 Smartphones You Should By Check Out The list
नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? मग दमदार फ्लॅगशिप स्मार्टफोन्सची ‘ही’ यादी पाहा
Food delivery app Zomato announced to give Bluetooth enabled helmets to its delivery partners
झोमॅटोचा खास उपक्रम! सर्व डिलिव्हरी पार्टनर्सना ब्लूटूथ हेल्मेटचे करणार वाटप

हेही वाचाः बक्षिसाच्या नावाखाली ५ कोटींच्या फसवणुकीचा प्रयत्न; Zerodha चे CEO नितीन कामत ग्राहकांना म्हणाले…

क्रोमा

क्रोमाचा ब्लॅक फ्रायडे सेल २४ नोव्हेंबरपासून सुरू झाला असून, २६ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. रिटेल दिग्गज गॅझेट्स आणि इलेक्ट्रॉनिक्सवर सवलतीच्या दरात OnePlus, Vivo आणि Realme यांसारख्या फोन ब्रँड्सचा सेलमध्ये समावेश असेल.

हेही वाचाः आता ई-सिमचे युग येणार का? ‘या’ मोठ्या कंपनीच्या सीईओंनी दिले संकेत

अ‍ॅमेझॉन

अ‍ॅमेझॉन यूएस टॅबलेट, स्पीकर, घड्याळे, फोन, लॅपटॉप आणि इतर अनेक उत्पादनांसारख्या गॅझेट्ससह विविध उत्पादनांवर ब्लॅक फ्रायडेचे सर्वात महत्त्वपूर्ण सवलत सादर करीत आहे.

अजिओ

Ajio कपडे, अ‍ॅक्सेसरीज, फुटवेअर आणि आयवेअरसह विविध उत्पादनांवर ५० ते ९० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. हा सेल २४ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत चालणार आहे. याव्यतिरिक्त Ajio Luxe मायकल कॉर्स, Kate Spade आणि Stella McCartney यांसारख्या प्रसिद्ध जागतिक ब्रँडवर ५० टक्के सूट देत आहे.

H&M

विशेष म्हणजे, H&M आपल्या सदस्य ग्राहकांसाठी सर्व उत्पादनांवर २० टक्के सूट देत आहे, जी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही खरेदीसाठी लागू आहे.

Zara

कपड्यांचा आणखी एक ब्रँड झारा निवडक वस्तूंवर ४० टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. झारा अ‍ॅपवर २३ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजता आणि ब्रँडच्या वेबसाइटवर १० वाजता सेल सुरू झाला आहे. स्टोअरमधील विक्री शुक्रवार २४ नोव्हेंबरपासून सुरू होईल.

नायका

Nykaa ने त्याच्या विक्रीला “पिंक फ्रायडे सेल” असे नाव दिले आहे, ज्यामध्ये २१०० हून अधिक ब्रँड्सवर ५० टक्क्यांपर्यंत सूट आहे. सेल २३ नोव्हेंबरपासून दुपारी ४ वाजता सुरू झाला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: From vijay sales to chrome black friday sale begins huge discounts on smartphones and laptops vrd

First published on: 24-11-2023 at 08:00 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×