भारतातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती गौतम अदाणी यांच्या व्यवसाय साम्राज्यात आता आणखी एक नवी कंपनी सामील होणार आहे. रिपोर्टनुसार, अदाणी समूहाची ऊर्जा कंपनी अदाणी पॉवर लवकरच दिवाळखोरीत निघालेली कोस्टल एनर्जेनचे अधिग्रहण करू शकते. यामुळे दक्षिणेकडील बाजारपेठेत अदाणींचा वाटा वाढण्याची अपेक्षा आहे.

बोलींच्या १८ फेऱ्यांनंतर निर्णय घेण्यात आला

ईटीच्या अहवालानुसार, दोन दिवस चाललेल्या बोली प्रक्रियेत शनिवारी संध्याकाळी अदाणी पॉवरची बोली विजेता म्हणून निवडण्यात आली. रिपोर्टमध्ये या प्रकरणाशी संबंधित दोन लोकांच्या हवाल्याने म्हटले आहे की, दिवाळखोरीत निघालेली वीज कंपनी कोस्टल एनर्जेनसाठी बोली प्रक्रिया शुक्रवारी दुपारी सुरू झाली. ही प्रक्रिया शनिवारी सायंकाळपर्यंत सुरू राहिली आणि यावेळी १८ फेऱ्यांमध्ये निविदा काढण्यात आल्या.

अदाणी पॉवर आणि डिकी अल्टरनेटिव्हची बोली

बोलीच्या १८ फेऱ्यांनंतर १९व्या फेरीत अदाणी पॉवरला यश मिळाले, जेव्हा इतर स्पर्धकांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. शेरीशा टेक्नॉलॉजीने बोलीमध्ये भाग घेतला नाही, तर जिंदाल पॉवरने १९व्या फेरीत काऊंटर बिड लावली नाही. शेवटच्या फेरीत अदाणी पॉवर आणि डिकी अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट ट्रस्टने ३४४० कोटी रुपयांची बोली लावली.

हेही वाचाः सरकारी बँकांची स्थिती सुधारतेय, मोदी सरकार आता ‘या’ दोन बँकांना विकण्याच्या तयारीत

अदाणी पॉवर अशा प्रकारे झाली सामील

कोस्टल एनर्जेन दिवाळखोर झाल्यानंतर कॉर्पोरेट दिवाळखोरीच्या प्रक्रियेत गेली. कंपनीचे पॉवर प्लांट कार्यरत आहेत. या कारणास्तव इतर अनेक कंपन्या कोस्टल एनर्जेनचा ताबा मिळवण्यासाठी उत्सुक होत्या. यासाठी शेरीशा टेक्नॉलॉजीज, जिंदाल पॉवर आणि डिकी अल्टरनेटिव्ह यांच्याकडून निविदासुद्धा आल्या. अदाणी पॉवरने स्वतंत्र बोली सादर केली नाही म्हणून नंतर बोलीसाठी डिकी अल्टरनेटिव्हशी भागीदारी केली.

हेही वाचाः २ हजारांची नोट चलनातून बाद झाल्यानंतर आता RBI चा १००० रुपयांच्या नोटेबाबत मोठा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

म्हणून कोस्टल एनर्जेन विशेष

कोस्टल एनर्जेनचे तामिळनाडूमध्ये दोन कार्यरत ऊर्जा प्रकल्प आहेत. दोन्ही प्रकल्पांची क्षमता ६०० मेगावॅट आहे. कंपनीचा तामिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशनसोबत सक्रिय वीज खरेदी करारही आहे, जो सप्टेंबर २०२८ पर्यंत वैध आहे. कोस्टल एनर्जेनसाठी कर्मचारी आणि विविध कर्जदारांचे १२,२४७ कोटी रुपयांचे दावे स्वीकारण्यात आलेत. अशा प्रकारे पाहिल्यास अदाणींची ऑफर ३५ टक्के कर्ज दाव्यांच्या बरोबरीची आहे. याबाबत अदाणी पॉवरने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.