Gold-Silver Price Today: सोने स्वस्त झाल्यामुळे ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. आज रविवारी, बाजार उघडताच सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण नोंदवली गेली असून उच्चांकी किमतीवरून सोने आणि चांदी किंचित स्वस्त झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंतच्या उच्चांकावरून स्वस्त किमतीत सोने खरेदीची ग्राहकांना आज संधी मिळणार आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७१,६३० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७१,७९० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ९०,७६० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ९०,९३० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. 

Gold Silver Price 8 June
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! सोने झाले स्वस्त; १० ग्रॅमचा दर पाहून बाजारात उसळली गर्दी
Gold Silver Price 30 May
Gold-Silver Price: ग्राहक आनंदी! सोन्याचा भाव कोसळला, १० ग्रॅमचा दर पाहून बाजारात गर्दी
Gold Silver Price on 06 June
Gold-Silver Price: सोन्याच्या किमतीने केला कहर, १० ग्रॅमचा दर ऐकून बाजारात पसरली शांतता!
Gold Silver Price
Gold-Silver Price: लोकसभेच्या निकालादिवशी सोन्याच्या दरात बदल; मुंबईतील १० ग्रॅमची किंमत आता…  
Gold Silver Price 23 May
Gold-Silver Price: सोन्याचा भाव पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद, १० ग्रॅमचा दर वाचून बाजारात गर्दी
Gold Silver Price on 11 June 2024
Gold-Silver Price: सरकार स्थापन होताच सोन्याचे बदलले दर, मुंबई-पुण्यात १० ग्रॅमची किंमत आता…
Gold Silver Price on 13 June 2024
Gold-Silver Price: बाजारपेठेत सोन्याचे भाव गडगडले, मुंबई-पुण्यात १० ग्रॅमचा दर आता… 
gold silver price
Gold-Silver Price: ऐन मतदानाच्या दिवशी सोन्याच्या किमतीत मोठा फेरबदल, मुंबईतील १० ग्रॅमची किंमत ऐकून ग्राहक…

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,५४२ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,५०० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,५४२ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,५०० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,५४२ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७१,५०० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,५४२ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,५०० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत. 

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.