Gold Silver Price Today : जगभरातील विविध घटना-घडामोडींचा परिणाम आर्थिक घडामोडींवर होताना दिसत आहे. सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्यांच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत आहे. आज सोन्याच्या दरात थोडासा बदल झालाय. आज,१० जुलै २०२५ रोजी, गुरुवारी भारतीय बाजारात सोन्याच्या दरात किंचित घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

आजचे सोन्याचे दर (Gold Rate Today)

आज सोन्याचे दर प्रति तोळ्यामागे फक्त १० रुपयांनी घसरले आहेत. आज २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ९८,१७० रुपये आहेत. काल हेच दर ९८,१८० रुपये होते. याशिवाय १० ग्रॅम चांदीचा दर १,०77 रुपये आहे.

२२ कॅरेट सोन्याचे दर (22k Gold Rate)

आज २२ कॅरेट सोन्याच्या दरातदेखील १० रुपयांनीच घसरण झाली आहे. प्रति तोळा सोन्याचे दर ८९,९९० रुपये आहेत. काल हे दर ९०,००० रुपये होते. ८ ग्रॅम सोन्याचे भाव ७१,९९२ रुपये आहे.

१८ कॅरेट सोन्याचे दर (18k Gold Rate)

आज १८ कॅरेट सोन्याच्या दरात १० तोळ्यामागे १०० रुपयांनी घट झाली आहे. प्रति तोळ्यामागे १० रुपयांनी घसरण झाली आहे. आज प्रति तोळा सोन्याचे दर ७३,६३० रुपये झाले आहेत. ८ ग्रॅम सोन्याचे दर ५८,९०४ रुपये आहेत.

सोन्याच्या दरात वाढ होण्याचं कारण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार शुल्कांच्या अंमलबजावणीची अंतिम मुदत 1 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. जागतिक आणि आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोन्याला अजूनही ‘सुरक्षित गुंतवणूक’ मानले जाते, ज्यामुळे त्याच्या किमतीत चढ-उतार होत राहतात.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोने खरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.