Gold-Silver Price Today: तुम्ही लग्नासाठी किंवा इतर कोणत्याही शुभ कार्यासाठी सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, ही तुमच्यासाठी योग्य संधी असू शकते. सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरूच आहे. आजही सोने स्वस्त झाले आहे. पण चांदीच्या दरात उसळी पाहायला मिळत आहे. आता अशी आहे सोने आणि चांदीची किंमत…

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७२,२८० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,६७० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८५,३६० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८४,७३० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

Viral Video Of Father And Childrens
VIRAL VIDEO: ‘बाबा आमचा सुपरस्टार… ‘ केकवरील मेणबत्त्या फुंकण्यासाठी जुगाड; प्लेटचा केला असा उपयोग की…; तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Papaya Leaf Water Benefits in Marathi
Papaya Leaf Water Benefits : आठवड्यातून तीनदा प्या पपईच्या पानांचे एक कप पाणी; जाणून घ्या मधुमेहापासून त्वचा-केसांच्या आरोग्यापर्यंतचे असंख्य फायदे
Gold Silver Price Today 3 October 2024 in Marathi
Gold Silver Rate Today : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमतीत घसरण, जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर
Coriander Juice benefits
Coriander Juice: रिकाम्या पोटी कोथिंबिरीचा रस प्यायल्यानं शरीरावर काय परिणाम होतो? वाचून व्हाल अवाक…
5 superfoods that can help prevent clogged arteries
रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होऊ नये म्हणून खा हे पाच सुपरफूड! तज्ज्ञांचा सल्ला
Boy teasing bull to over noise near his ear then bull revenge from boy shocking video
“काय गरज होती का?” बैलाच्या कानाजवळ वाजवला ताशा अन् शेवटी…; VIDEO पाहून तुम्हीच सांगा हे कितपत योग्य
milk with salt being harmful for health is this true
Milk With Salt : दुधात चिमूटभर मीठ टाकून प्यायल्यास चेहऱ्याला खाज सुटते का? हा दावा खरा की खोटा? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६६,१३८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,१५० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,१३८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७२,१५० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,१३८ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७२,१५० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,१३८ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,१५० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत. 

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.