मुंबई : श्रवण आणि संतुलन विकारांचे मूल्यांकन, निदान आणि व्यवस्थापन करणाऱ्या हिअरिंग सोल्युशन्स या आघाडीच्या ऑडिओलॉजी शृंखलेलेने ५० कोटी रुपयांची निधी उभारणी केली आहे. ३६० वन अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेड (३६० वन अॅसेट) या नव्याने सुरू झालेल्या हेल्थकेअर आणि लाइफसायन्सेस फोकस प्रायव्हेट इक्विटी फंडाच्या विक्रीतून निधी उभारणी करण्यात आली आहे.
हैदराबाद येथे मुख्यालय असलेल्या हिअरिंग सोल्युशन्स (हियरझॅप) हे रिमोट डायग्नोसिस आणि व्हर्च्युअल शॉपिंग या नाविन्यपूर्ण डिजिटल संचाद्वारे ऑडिओलॉजी केअरमध्ये अग्रणी आहे. सात राज्यांमध्ये ९० हून अधिक ऑडिओलॉजी निदान दालने आहेत. यासोबत शंभरहून अधिक अनुभवी ऑडिओलॉजिस्ट चमूसह संपूर्ण सर्वसमावेशक श्रवणविषयक सेवा आणि नामांकित आंतरराष्ट्रीय श्रवण सहाय्य नाममुद्रेसह विशेष भागीदारीसह त्याची मजबूत उपस्थिती आहे.
आणखी वाचा-अदानी पोर्ट्सच्या श्रीलंकेतील प्रकल्पाला अमेरिकेकडून बळ
हेअरझॅपसाठी हा एक उल्लेखनीय क्षण आहे. ३६० वनसोबतच्या भागीदारीमुळे आर्थिक आणि धोरणात्मक मदतीने आता हेअरझॅप ग्राउंड ब्रेकिंग तंत्रज्ञान आणि सेवा सादर करू शकणार आहे, असे हेअरझॅपचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सेल्वराज राजपांडियन म्हणाले. आमच्या हेल्थकेअर आणि लाइफसायन्सेस फोकस पीई फंडातून ही पहिली गुंतवणूक असून आरोग्य सेवा क्षेत्रातील गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे
श्रवण आरोग्य ही एक वाढती बाजारपेठ आहे. हेअरझॅप हे देशातील श्रवणविषयक आरोग्य सुविधा देण्यात अग्रेसर आहे, ३६० वन अॅसेटच्या वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष निधी घुमान म्हणाल्या.