जेट एअरवेज ताब्यात घेण्यासाठी संयुक्तरीत्या यशस्वीपणे बोली लावणाऱ्या जालान-कालरॉक गटाला स्टेट बँकेच्या थकीत कर्जाची फेड करण्यास राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय न्यायाधिकरणाने (एनसीएलएटी) शुक्रवारी मुदतवाढ देऊन मोठा दिलासा दिला. दिवाळखोर विमानसेवा जेट एअरवेजची प्रमुख कर्जदार असलेल्या स्टेट बँकेला १५० कोटी रुपयांची हमी वळती करून घेण्यास निर्बंध घालण्याची मागणी करणारा अर्ज जालान कालरॉक गटाने ‘एनसीएलएटी’कडे दाखल केला होता. या प्रकरणी निर्णय राखून ठेवून तो ३० मे रोजी सुनावला जाणार होता; परंतु पाच दिवस आधीच तो तडीस नेताना ‘एनसीएलएटी’ने जालान कालरॉक गटाला स्टेट बँकेचे देणी भागवण्यास अतिरिक्त ९७ दिवसांचा कालावधी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचाः सरकारने सात लाखांपर्यंतचे आंतरराष्ट्रीय व्यवहार टीसीएसमधून वगळले; छोट्या करदात्यांना मोठा दिलासा

एके काळी देशातील अग्रणी विमानसेवा असलेल्या जेट एअरवेजची उड्डाणे एप्रिल २०१९ पासून ठप्प आहेत. कंपनीची दिवाळखोरी प्रक्रिया जून २०१९ पासून सुरू झाली. त्यानंतर लंडनस्थित कालरॉक कॅपिटल आणि संयुक्त अरब अमिरातीस्थित मुरारी लाल जालान यांच्या गटाने संयुक्तपणे कंपनी ताब्यात घेण्यासाठी अर्ज केला. तो मंजूर झाला आहे. जेट एअरवेजच्या कर्जाच्या परफेडीचा पहिला हप्ता स्टेट बँकेला या गटाकडून १५ मे रोजी दिला जाणे अपेक्षित होता; परंतु तो देण्यात आला नाही. त्यामुळे हमी म्हणून जमा १५० कोटी रुपये स्टेट बँकेकडून वळते करून घेतले जातील, अशी भीती त्यांना होती.

हेही वाचाः जागतिक व्यापारातील भारताचा निर्यात टक्का घसरला; औषध निर्माण, रत्न-आभूषणे, चामडे, पादत्राणे क्षेत्रात पीछेहाट

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In the case of jet airways extension of time to jalan kalrock group nclat decision vrd
First published on: 26-05-2023 at 19:32 IST