आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीत देशातील आर्थिक वाढ ८.४ टक्के दराने झाली आहे. देशाचा जीडीपी तिसऱ्या तिमाहीत ८.४ टक्के होता, जो चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबरच्या दुसऱ्या तिमाहीत ७.६ टक्के राहिला होता. गेल्या आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या तिसऱ्या तिमाहीत जीडीपी ४.४ टक्के होता. सांख्यिकी मंत्रालयाने आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी GDP चा दुसरा आगाऊ अंदाज देखील जारी केला आहे. या आकडेवारीनुसार, भारताचा आर्थिक विकास दर म्हणजेच GDP चालू आर्थिक वर्षात ७.६ टक्के असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, जो २०२२-२३ मध्ये ७ टक्के होता.

भारतीय अर्थव्यवस्था वेगानं वाढतेय

आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी डेटा जारी करताना सांख्यिकी मंत्रालयाच्या NSO (नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस) ने महत्त्वाची माहिती दिलीय. भारतीय अर्थव्यवस्थेने तिसऱ्या तिमाहीत ८.४ टक्के वाढ दर्शविली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या तिसऱ्या तिमाहीत GDP ४०.३५ लाख कोटी रुपयांवरून चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ४३.७२ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. उत्पादन क्षेत्राचा विकास दर ११.६ टक्के आहे आणि बांधकाम क्षेत्राचा विकास दर ९.५ टक्के आहे. तर जीडीपी ८.४ टक्के आहे, असंही सांख्यिकी मंत्रालयाच्या एनएसओने सांगितले. या आर्थिक वर्षात GDP ७.६ टक्के असण्याचा अंदाज आहे, जो २०२२-२३ मध्ये ७ टक्के होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात वास्तविक जीडीपी १७२.९० लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे, जो २०२२-२३ मध्ये १६०.७१ लाख कोटी रुपये होता.

Congress accuses the government that more and more families are in debt
अर्थव्यवस्थेची परिस्थिती बिकट! अधिकाधिक कुटुंबे कर्जाच्या विळख्यात सापडल्यचा काँग्रेसचा सरकारवर आरोप
india demand of land marathi news
कार्यालयीन जागांच्या मागणीत ४३ टक्के वाढ, पहिल्या तिमाहीत १.६२ कोटी चौरस फुटांचे व्यवहार; बंगळूरुचा सर्वाधिक वाटा
RBI repo rate announcement Shaktikanta Das
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याचे कारण काय? जाणून घ्या
HDFC Bank shares up 3 percent on rise in deposits loans
ठेवी, कर्जातील वाढीने एचडीएफसी बँक समभागाची ३ टक्क्यांनी झेप

उत्पादन क्षेत्रातही मोठी वाढ

एनएसओने जारी केलेल्या आकडेवारीनुसार २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कृषी क्षेत्राचा विकास दर ३.८ टक्के आहे, जो २०२२-२३ च्या तिसऱ्या तिमाहीत ६.७ टक्के होता. उत्पादन क्षेत्राचा विकास दर १०.६ टक्के आहे, जो गेल्या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत -०.२ टक्के होता. बांधकाम क्षेत्राचा विकास दर १०.४ टक्के आहे, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत १५.५ टक्के होता. व्यापार, हॉटेल, वाहतूक, दळणवळण आणि प्रसारणाशी संबंधित सेवांचा वाढीचा दर ७.४ टक्के होता, जो पूर्वी १५.१ टक्के होता. आर्थिक, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवांचा विकास दर ९.२ टक्के होता जो गेल्या वर्षी याच तिमाहीत १५.४ टक्के होता. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत वीज, गॅस आणि पाणीपुरवठा आणि इतर उपयोगिता सेवांचा वाढीचा दर ४.१ टक्के राहिला आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत ४.१ टक्के होता.