नवी दिल्ली : देशातील निर्मिती क्षेत्राची कामगिरी आणि उत्पादन वाढीचे प्रतिबिंब मानल्या जाणाऱ्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने (आयआयपी) एप्रिलमध्ये महिन्यामध्ये ५ टक्क्यांवर पोहोचले, असे बुधवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून स्पष्ट केले. उद्योग क्षेत्राच्या गतिमानतेचा सूचक मानला जाणाऱ्या या निर्देशांकाचा हा तीन महिन्यांतील नीचांक स्तर असून, या आधी म्हणजे मार्चमध्ये ते ५.३ टक्के, तर फेब्रुवारी २०२४ मध्ये ५.६ टक्क्यांनी वाढले होते. याआधी जानेवारी २०२४ मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने ४.२ टक्के असा नीचांक नोंदवला होता.

हेही वाचा >>> Gold-Silver Price: सोन्याचा भाव ऐकून बाजारात उडाली खळबळ; जाणून घ्या १० ग्रॅमची किंमत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सांख्यिकी मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, निर्मिती क्षेत्राची वाढ जूनमध्ये ३.९ टक्क्यांवर मर्यादित राहिली. ती गेल्या वर्षी याच कालावधीत (एप्रिल २०२३) ५.५ टक्के नोंदवली गेली होती. तर वीजनिर्मिती क्षेत्राने जोरदार कामगिरी दाखवत १०.२ टक्के वाढ साधली. जी गेल्या वर्षी याच महिन्यात केवळ १.१ टक्के नोंदवली गेली होती. खाण उद्योगाने ६.७ टक्के वाढ नोंदवून समाधानकारक कामगिरी केली. जो मागील वर्षीच्या महिन्यात ५.१ टक्क्यांनी वाढला होता. भांडवली वस्तू विभागातील वाढ गेल्या वर्षीच्या ४.४ टक्क्यांवरून एप्रिल २०२४ मध्ये ३.१ टक्क्यांपर्यंत घसरली आहे. या वर्षी एप्रिलमध्ये ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तूंचे उत्पादन ९.८ टक्क्यांनी वधारले आहे. एप्रिल २०२३ मध्ये ते २.३ टक्क्यांनी घसरले होता. तर पायाभूत सुविधा/बांधकाम क्षेत्राने एप्रिल २०२४ मध्ये ८ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.