नवी दिल्ली : देशांतर्गत व्यवहारांमुळे मार्चमध्ये वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी संकलन वार्षिक तुलनेत ११.५ टक्क्यांनी वाढून १.७८ लाख कोटी रुपये नोंदवले गेले, असे केंद्रीय अर्थमंत्रालयाने सोमवारी स्पष्ट केले, जे आजवरचे सर्वोच्च दुसरे मासिक संकलन आहे. एप्रिल २०२३ मध्ये आतापर्यंतचे सर्वोच्च १.८७ लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन नोंदवले गेले आहे.

हेही वाचा >>> निर्गुंतवणूक लक्ष्याची सरकारला पुन्हा हुलकावणी! सरकारी मालकीच्या कंपन्यांमधील हिस्सा विक्रीतून १६,५०७ कोटींचा लाभ

सरलेल्या आर्थिक वर्षात (एप्रिल २०२३ ते मार्च २०२४) एकूण जीएसटी संकलन २०.१८ लाख कोटी रुपये झाले आहे, जे आधीच्या आर्थिक वर्षातील जमा महसुलापेक्षा ११.७ टक्के जास्त आहे. मावळलेल्या आर्थिक वर्षात सरासरी मासिक सकल संकलन १.६८ लाख कोटी रुपये होते, जे आधीच्या आर्थिक वर्षातील १.५० लाख कोटी रुपयांच्या सरासरी मासिक संकलनापेक्षा जास्त होते.

हेही वाचा >>> पंतप्रधान मोदींच्या हस्ते ९० रुपयांचे नाणे लाँच, RBI ला ९० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गिफ्ट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मार्च २०२४ साठी सकल वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) महसूल वार्षिक तुलनेत ११.५ टक्के वाढीसह १.७८ लाख कोटी रुपये झाले. उल्लेखनीय म्हणजे, हे आजवरचे दुसरे सर्वोच्च मासिक संकलन असून, देशांतर्गत जीएसटी संकलनात लक्षणीय १७.६ टक्के वाढ झाल्यामुळे हे शक्य झाले, असे अर्थ मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. परतावा (रिफंड) वजा जाता मार्च २०२४ साठी नक्त जीएसटी महसूल १.६५ लाख कोटी रुपये आहे, जो वर्षापूर्वीच्या याच महिन्याच्या तुलनेत १८.४ टक्क्यांनी जास्त आहे.