नवी दिल्ली : हिंदुस्तान झिंक लिमिटेडचे वेगवेगळ्या घटकांमध्ये विभाजन करण्याचा वेदांत समूहाच्या प्रस्ताव केंद्रीय खाण मंत्रालयाने नाकारला आहे. सरकार हिंदुस्तान झिंकमधीलअल्पसंख्याक भागधारक श्रेणीतील सर्वात मोठा भागीदार आहे, ज्यांची कंपनीत २९.५४ टक्के हिस्सेदारी आहे. वेदांत समूहाने हिंदुस्तान झिंकबाबत दिलेल्या विभजनाचा प्रस्तावाशी सहमत नसून तो नाकारत असल्याचे केंद्रीय खाण सचिव व्ही एल कांथा राव यांनी दिली. हिंदुस्तान झिंकने यापूर्वी आपले बाजारभांडवल वाढवण्यासाठी झिंक आणि सिल्व्हर यासह स्वतंत्र संस्थांमध्ये विभाजन करून व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली होती. मात्र भागधारक म्हणून आम्हाला वेदांतचा निर्णय पटलेला नाही, असे कांथा राव यांनी सांगितले. शिवाय सध्या एका आघाडीच्या सल्लागार कंपनीला व्यवसायाला गती प्राप्त करून देण्यासाठी आणि तिच्या योजनांचा अभ्यास करण्यासाठी नेमले आहे.

हेही वाचा >>> Gold-Silver Price on 22 March 2024: विक्रमानंतर दुसऱ्याच दिवशी सोन्या-चांदीचे दर थंडावले, १० ग्रॅमची किंमत आता…

हिंदुस्तान झिंकच्या संचालक मंडळाने संभाव्य मूल्यवाढ करण्यासाठी तिच्या संरचनेचा सर्वसमावेशक आढावा घेण्याचा निर्णय घेतला होता. जस्त, शिसे, चांदी आणि रीसायकलिंग व्यवसायांसाठी स्वतंत्र कायदेशीर संस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने निर्णय घेण्यात आला होता. व्यवसाय-विशिष्ट गतिशीलतेवर आधारित योग्य भांडवल रचना, भांडवली वाटप धोरण तयार करणे आणि मुख्य क्षमतांवर लक्ष केंद्रित करणे. याशिवाय कंपनीच्या संसाधनांचे योग्य पुनर्संरचना करणे हे या मागचे उद्दिष्ट आहे. मुंबई शेअर बाजारात शुक्रवारच्या सत्रात हिंदुस्तान झिंक लिमिटेडचा समभाग १ टक्क्यांच्या वाढीसह २९७ रुपयांवर बंद आला. सध्याच्या बाजारभावानुसार कंपनीचे, १.२५ लाख कोटींचे बाजारभांडवल आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.