पाश्चिमात्य देशांतील मंदीचा परिणाम आता भारतातही दिसून येत आहे. आयटी क्षेत्र हे भारतातील सर्वात मोठ्या नोकऱ्या पुरवठादारांपैकी एक आहे. TCS, Infosys आणि Wipro अशा कंपन्या आहेत, ज्या दरवर्षी लाखो लोकांना रोजगार देतात. यामध्ये फ्रेशर्सही मोठ्या प्रमाणात समावेश असतो. परंतु या कंपन्यांचे बहुतांश ग्राहक पाश्चिमात्य देशांतील आहेत आणि त्यामुळेच यंदा या कंपन्यांच्या नोकरभरतीत कपात होण्याची शक्यता आहे. म्हणजेच आयटी क्षेत्रातील नोकऱ्या कमी होऊ शकतात.

चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारतातील आघाडीच्या आयटी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांची नियुक्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्क्यांनी कमी होऊ शकते. स्टाफिंग कंपनी गेफेनोच्या मते, गेल्या वर्षी या टॉप आयटी कंपन्यांनी २.५ लाखांहून अधिक नवीन नोकऱ्या दिल्या होत्या, यंदा त्यांनी नियुक्त केलेल्या नोकऱ्यांची संख्या ५०,००० ते १,००,००० पर्यंत असू शकते.

हेही वाचाः टेस्ला भारतात येण्याच्या तयारीत; एलॉन मस्क यांनी भारतीय वंशाच्या व्यक्तीची नवीन CFO म्हणून केली नियुक्ती

आयटी कंपन्यांचे कर्मचारी कमी झाले

केवळ एप्रिल-जूनपर्यंतच्या आकड्यांवर नजर टाकली तर लक्षात येईल की, देशातील टॉप ५ आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत २१,८३८ ची घट झाली आहे. यामध्ये TCS, Infosys, HCL टेक्नॉलॉजी, विप्रो आणि टेक महिंद्रा यांचा समावेश आहे. IT क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी TCS ने या ३ महिन्यांत केवळ ५०० लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. दुसरीकडे इतर चार कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. त्यामुळे एकूणच कर्मचाऱ्यांची संख्या घटली आहे.

हेही वाचाः जगभरात साखरेचा गोडवा कमी होणार? भारत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंतरराष्ट्रीय कंपन्यांचीही अवस्था बिकट

ही स्थिती केवळ भारतीय कंपन्यांची नव्हे, तर आंतरराष्ट्रीय कंपन्यांची स्थितीही बिकट आहे. अहवालानुसार, भारतात काम करणाऱ्या Accenture, Capgemini आणि Cognizant यांसारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्येही कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. भारतात मोठा आधार असलेल्या या सर्व कंपन्यांमध्ये प्रत्येकी ५,००० कर्मचाऱ्यांची संख्या घटली आहे. टीमलीज डिजिटलचे मुख्य कार्यकारी सुनील म्हणतात की, हे वर्ष आयटी कंपन्यांमध्ये जॉब क्लीनिंगचे वर्ष असल्याचे दिसते. चालू आर्थिक वर्षात त्यात ४० टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे.