नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील देशातील आघाडीच्या कंपन्यांच्या मनुष्यबळात मार्चअखेर सरलेल्या आर्थिक वर्षात घट नोंदविण्यात आली आहे. यात टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो या प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे.

विप्रो कंपनीच्या मनुष्यबळात मागील दशकभरात तिसऱ्यांदा वार्षिक घट नोंदविण्यात आली आहे. कंपनीचे मनुष्यबळ आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या सुरुवातीला २ लाख ५८ हजार ५७० होते. आर्थिक वर्षाच्या अखेरीस ते २ लाख ३४ हजार ५४ वर घसरले. वर्षभरात कंपनीच्या मनुष्यबळात एकूण २४ हजार ५१६ म्हणजेच ९.५ टक्के घट झाली. सलग सहाव्यात तिमाहीत विप्रोच्या मनुष्यबळात घट झाली आहे.

Auction vehicles of developer Andheri,
मालमत्ता कर थकवणाऱ्या अंधेरीतील विकासकाच्या तीन गाड्यांचा लिलाव
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
huge investment by nine companies in pune
पुण्यातील तळेगाव दाभाडेत ह्युंदाई स्टीलसह नऊ कंपन्यांची मोठी गुंतवणूक! रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार
india s service sector growth at 10 month low in september
सेवा क्षेत्रही मरगळीकडे! सप्टेंबरचा ‘पीएमआय’ १० महिन्यांच्या नीचांकावर
Sensex falls due to rising tensions in Gulf countries and equity sell off
समभाग विक्रीच्या तुफान माऱ्याने सेन्सेक्स ८२ हजारांखाली
IPO
जागतिक स्तरावर आयपीओच्या माध्यमातून ८२२ कंपन्यांकडून ६५ अब्ज डॉलरची निधी उभारणी
Vasai Virar Municipal Corporation has published the VIP list in the city
पालिकेच्या व्हीआयपींच्या यादीत राजकारण्यांचा भरणा; शहरातील मान्यवर नागरिकांना वगळले
car market india
हवामान बदलामुळे गाड्यांची विक्री मंदावली?

हेही वाचा >>> Gold-Silver Price on 19 April 2024: सोन्याच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्याचं बजेट बिघडवलं, जाणून घ्या १० ग्रॅमचा दर

टीसीएसचे मनुष्यबळ गेल्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ६ लाख १४ हजार ७९५ होते. आर्थिक वर्ष संपले त्या वेळी हे मनुष्यबळ ६ लाख १ हजार ५४६ वर आले आहे. मनुष्यबळात एकूण १३ हजार २४९ म्हणजेच २.१ टक्के घट नोंदविण्यात आली. टीसीएसच्या मनुष्यबळात १९ वर्षांमध्ये पहिल्यांदाच घट झाली आहे.

इन्फोसिसचे मनुष्यबळ गेल्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ३ लाख ४३ हजार २३४ होते. आर्थिक वर्षाच्या अखेरीस ते ३ लाख १७ हजार २४० वर आले. वर्षभरात कंपनीच्या मनुष्यबळात एकूण २५ हजार ९९४ म्हणजेच ७.५ टक्के घट नोंदविण्यात आली आहे. कंपनीच्या मनुष्यबळात दोन दशकांत प्रथमच घट झाली आहे.

मनुष्यबळातील घट २०२३-२४

कंपनी – एकूण घट – टक्क्यांमध्ये

विप्रो – २४ हजार ५१६ – ९.५

इन्फोसिस – २५ हजार ९९४ – ७.५

टीसीएस – १३ हजार २४९ – २.१