मुंबई : भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने छोट्या रकमेपासून म्युच्युअल फंडात गुंतवणूक शक्य बनवणाऱ्या, दरमहा २५० रुपयांच्या ‘सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी)’चा पर्याय खुला करण्याचा प्रस्ताव म्युच्युअल फंड उद्योगासाठी ‘गेम चेंजर’ ठरेल. एलआयसीने ऑक्टोबर २०२४ पासून दरमहा किमान २०० रुपये ‘एसआयपी’चा पर्याय देऊ केला आहे. तर फंडात दररोज गुंतवणूक करणाऱ्यांना किमान १०० रुपयांपासून गुंतवणूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे, असे एलआयसी एमएफचे मुख्याधिकारी आर.के. झा यांनी सांगितले. देशातील प्रतिष्ठित फंड घराण्यांपैकी एक असलेल्या, एलआयसी म्युच्युअल फंडाने, ‘एलआयसी एमएफ मल्टी अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन’ हा नवीन फंड गुंतवणुकीसाठी खुला केला आहे. यावेळी ते बोलत होते. या नवीन फंडाचा प्रस्तुती (एनएफओ) अर्थात प्रारंभिक गुंतवणूक कालावधी येत्या ७ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सुरू आहे. ही एक गुंतवणुकीस कायम खुली (ओपन-एंडेड) असणारी योजना असून, जी समभाग (इक्विटी), रोखे (डेट) आणि सोन्यांत गुंतवणूक करेल.

एनएफओ २४ जानेवारीपासून गुंतवणुकीस खुला झाला आहे. या योजनेचे गुंतवणूक उद्दिष्ट समभाग आणि समभागांशी संलग्न साधनांच्या विविध पोर्टफोलिओमध्ये, रोखे आणि मनी मार्केट साधनांमध्ये तसेच गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडाच्या (गोल्ड ईटीएफ) युनिट्समध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन भांडवलवृद्धी करण्याचे आहे. ‘एलआयसी एमएफ मल्टी अ‍ॅसेट अ‍ॅलोकेशन फंडा’साठी निखिल रुंगटा, सुमित भटनागर आणि प्रतीक श्रॉफ हे निधी व्यवस्थापक आहेत. ही योजना १८ फेब्रुवारी २०२५ रोजी निरंतर विक्री आणि पुनर्खरेदीसाठी पुन्हा खुली होईल. नवीन योजनेवर भाष्य करताना, एलआयसी म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर.के. झा म्हणाले, ‘मल्टी-अ‍ॅसेट अॅलोकेशन फंड’ हे अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. कारण ते एकाच मालमत्तेतील केंद्रीकरणाची जोखीम कमी करतात आणि गुंतवणुकीत चांगले वैविध्य राहिल हे पाहतात. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (अॅम्फी) ने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार, २०२४ मध्ये हायब्रिड म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत (एयूएम) २७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही मालमत्ता जानेवारी २०२४ मध्ये ₹६.९० लाख कोटी होती, ती डिसेंबर २०२४ मध्ये ८.७७ लाख कोटी झाली आहे. विशेष म्हणजे, हायब्रिड श्रेणी अंतर्गत मल्टी-अ‍ॅसेट अॅलोकेशन फंडाच्या मालमत्तेत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. यातून गुंतवणूकदारांचे सध्या हायब्रिड फंडांकडे आकर्षण स्पष्टपणे दिसून येत आहे आणि आमचा नवीन फंड त्यांच्या हितसंबंधांच्या पूर्ततेसाठी निश्चितच आदर्श आहे.”

Take stringent action against those who trouble harass industries Fadnavis directs police
द्योजकांना त्रास देणाऱ्यांवर ‘मकोका’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Hexaware Technologies IPO news in marathi
टीसीएसनंतर ‘या’ आयटी कंपनीचा सर्वात मोठा आयपीओ बाजारात येतोय; जाणून घ्या किंमत
Pension scheme for gig workers on Ola, Uber, Swiggy platforms
ओला,उबर, स्विगी मंचावरील गिग कामगारांसाठी पेन्शन योजना; कशी असेल वेतन योजना, लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाची मोहोर
Startup Ecosystem State wise Startup Growth and Loan Disbursement Trends
स्टार्टअप्सना बळकटी मिळण्याची आशा
Increase in foreign direct investment in insurance sector in the budget
कीमत जो तुम चाहो
cryptocurrency tax
Cryptocurrency Trading : क्रिप्टो ट्रेडिंग आणि नफ्यावर किती कर द्यावा लागणार? अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी काय सांगितलं?
Encouraging private sector investment
खासगी क्षेत्राला गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन

मल्टी-अ‍ॅसेट अॅलोकेशन फंड’ हा एक असा उपाय आहे जो वाढीसाठी समभागांची शक्ती, रोख्यांद्वारे उत्पन्न निर्मिती आणि कमोडिटीजची कणखरता यांचे उत्तम संयोजन साधतो. अस्थिर काळात वाढीच्या संधींसाठी हा फंड एक संतुलित मार्ग प्रदान करतो. जे गुंतवणूकदार एकाच वेळी सर्व तीन मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करू इच्छितात आणि शुद्ध समभागसंलग्न (इक्विटी) योजनांपेक्षा तुलनेने कमी अस्थिरता असलेल्या योजनेच्या शोधात असणारे या योजनेत गुंतवणूक करू शकतात. बाजाराचा दीर्घकालीन दृष्टीकोन तेजीचा आहे हे सुस्पष्टच आहे आणि हा नवीन फंड सर्व गुंतवणूकदारांना या लाटेवर स्वार होण्याची संधी देत आहे, असे एलआयसी म्युच्युअल फंड अॅसेट मॅनेजमेंट लिमिटेडचे सह-मुख्य गुंतवणूक अधिकारी – समभाग निखिल रुंगटा म्हणाले.

Story img Loader