प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी यांच्या अदाणी समूहाच्या अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मागच्या आठवड्याभरापासून पडझड सुरु होती. आज मंगळवारी ही पडछड थांबली. Adani Wilmar पासून Adani Port पर्यंत आठ शेअर्समध्ये आज तेजी पाहायला मिळाली, तर दोन कंपन्यांचे शेअरचे भाव उतरले. Adani Enterprises या शेअरचा तर सकाळपासूनच चढता आलेख पाहायला मिळाला. तब्बल १४.२८ टक्क्यांची वाढ या शेअरमध्ये पाहायला मिळाली. २४ जानेवारी रोजी अमेरिकेतील हिंडेनबर्ग या संस्थेने अदाणी समूहाच्या शेअर्समधील फेरफारबाबतचा अहवाल सार्वजनिक केल्यानंतर शेअर बाजारात भूकंप आला होता. १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार होता, त्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारावर काहीसा तणाव पाहायला मिळाला. मात्र अदाणी समूहाने एफपीओची गुंतवणूक परत करण्याचा घेतलेला निर्णय असो किंवा एसबीआय कर्जाबाबत दिलेली माहिती, त्यामुळे शेअर बाजारात पुन्हा एकदा आश्वासक चित्र पाहायला मिळाले.

हे वाचा >> अदाणी समूहाबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे मोठे विधान; LIC, SBI बाबतही मौन सोडले

layoffs in 2024 leading it companies cutting jobs in year 2024
‘आयटी’ कंपन्यांच्या मनुष्यबळात घट; देशातील आघाडीच्या टीसीएस, इन्फोसिस, विप्रोचा समावेश
Maruti Suzuki Raises Prices of Select Vehicles Swift and Grand Vitara Included
मारुती सुझुकीकडून निवडक वाहनांच्या किमतीत वाढ
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
ED Seizes Assets more than Rs 24 Crore from VIPS Group Owner Vinod Khute
व्हीआयपीस् ग्रुपच्या विनोद खुटे याच्याशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच, ५८ बँक खात्यातील रक्कम व ठेवींचा समावेश

अदाणीच्या शेअर्सची आजची परिस्थिती अशी

अदाणी एंटरप्रायझेसच्या (Adani Enterprises) शेअरचे भाव १४.२८ टक्क्यांनी वाढून १,७९७ रुपयांवर पोहोचले. अदानी ट्रान्समिशन (Adani Transmission) ५ टक्क्यांनी वाढून १,३२४.४५४ वर पोहोचला. अदानी पोर्ट्स आणि विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये ५.७९ टक्क्यांची वाढ होऊन ५७७.६५ रुपयांवर हा शेअर गेला. तर अदाणी ग्रीन एनर्जीमध्ये (Adani Green Energy) जवळपास ३ टक्क्यांची वाढ झाली. हा शेअर ९१३.७० वर पोहोचला. अदाणी विल्मरचा शेअर ४.९९ टक्क्यांनी वाढून ३९९.४० वर पोहोचला.

एसीसी (ACC) शेअरमध्ये ३.१३ टक्क्यांची वाढ होऊन हा शेअर २,०३१.२० रुपयांवर पोहोचला. अंबूजा सिमेंट्स ३.२० टक्क्यांनी वाढून ३९१.६० रुपयांवर पोहोचला. तर माध्यम क्षेत्रात अदाणींनी काही काळापूर्वी प्रवेश करुन एनडीटीव्ही वृत्तवाहिनीला स्वतःच्या ताब्यात घेतले होते. या वाहिनीचे शेअर्समध्ये देखील ५ टक्क्यांची वाढ होऊन २२५.३५ रुपयांवर शेअर पोहोचला.

हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर २४ जानेवारीपासून अदाणी समूहाचे शेअरमध्ये ६६ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती. ज्यामुळे बाजारातील अदाणी समूहाचे भांडवल ९.५ लाख कोटींनी घसरले होते. तसेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून गौतम अदाणी हे चौथ्या स्थानावरुन खाली येत २२ व्या स्थानावर आले होते. या सर्व संकटाची पार्श्वभूमी असतानाही आज अदाणी समूहातील कंपन्यांनी चांगली कामगिरी केली.