scorecardresearch

Premium

Neeraj Chopra : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांचाही व्यावसायिक जगतात प्रवेश, ‘या’ स्टार्टअपमध्ये केली गुंतवणूक

कोविड १९ नंतर ओटीटी (over the top) प्लॅटफॉर्म खूप लोकप्रिय झाले. त्यांनी करोडोंच्या घरात आपले स्थान निर्माण केले. स्टेज अॅपदेखील २०१९ मध्येच लाँच करण्यात आले होते.

Neeraj Chopra
(फोटो क्रेडिट- फायनान्शिअल एक्सप्रेस)

Neeraj Chopra: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा यानेही व्यवसायाच्या दुनियेत प्रवेश केला आहे. भालाफेक सुपरस्टार नीरज चोप्राने ओटीटी स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करून आपला व्यावसायिक प्रवास सुरू केला आहे. त्यांनी प्रादेशिक ओटीटी प्लॅटफॉर्म स्टेज (Stage OTT App) मध्ये पैसे गुंतवले आहेत. हे अॅप दिवसेंदिवस लोकप्रिय होत चालले आहे. यावर हिंदी तसेच स्थानिक भाषांमध्ये सामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, नीरजची गुंतवणूक आणि भागभांडवल याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

२०१९ मध्ये स्टेज लाँच केले

कोविड १९ नंतर ओटीटी (over the top) प्लॅटफॉर्म खूप लोकप्रिय झाले. त्यांनी करोडोंच्या घरात आपले स्थान निर्माण केले. स्टेज अॅपदेखील २०१९ मध्येच लाँच करण्यात आले होते. ६० लाखांहून अधिक जणांनी ते आतापर्यंत इन्स्टॉल केले आहे. तसेच सुमारे ५.५ लाख लोक त्याचे सदस्य आहेत. हे OTT अॅप स्थानिक भाषा आणि बोली भाषांमध्ये सामग्री प्रदान करण्यासाठी ओळखले जाते.

KL Rahul IPL 2024 Shoot Video Viral
VIDEO : ‘हे कोण लिहितंय…’, आयपीएल शूटमध्ये केएल राहुलचा संयम सुटला, स्क्रिप्टवरुन कर्मचाऱ्यावर संतापला
Tania Sing Ends her Life
लोकप्रिय मॉडेलची आत्महत्या, शेवटच्या कॉलमुळे IPL मधला प्रसिद्ध खेळाडू अडचणीत
Mark Boucher Explains Rohit Sharma Mumbai Indians Captaincy sport news
रोहितवरील दडपण कमी करण्यासाठी नेतृत्वबदल! मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचरचे स्पष्टीकरण
Mark Boucher on Rohit Sharma Captaincy
Rohit Sharma : ‘…म्हणून रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवले’, मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकाचा मोठा खुलासा

हेही वाचाः Raj Kapoor Bungalow : राज कपूर यांच्या बंगल्याच्या जागी बांधला जातोय आलिशान गृहप्रकल्प, किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

मला माझ्या भाषेचा अभिमान- नीरज चोप्रा

नीरज चोप्रा म्हणाले की, आपण ज्या ठिकाणाहून आलो आहोत, तेथील संस्कृती, भाषा आणि बोलीभाषा यांचा प्रचार करणे अत्यंत आवश्यक आहे. ही माझी ओळख आहे आणि याचा मला अभिमान आहे. म्हणूनच मी स्टेजमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. विविधता आणि भाषांना पुढे नेण्यासाठी आम्ही एकत्र काम करू. या भागीदारीची घोषणा नीरज चोप्रा यांच्या खंद्रा गावात करण्यात आली, जे हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यात आहे.

हेही वाचाः टाटा ग्रुपच्या टीसीएस कंपनीला आठवड्याभरात दुसऱ्यांदा लाखो डॉलर्सचा दंड, नेमकं प्रकरण जाणून घ्या

कंपनी अधिक चांगले काम करेल

स्टेजचे सीईओ आणि सह संस्थापक विनय सिंघल म्हणाले की, आम्ही नीरज चोप्राचे स्वागत करतो. त्याच्या प्रवेशामुळे कंपनी अधिक चांगले काम करेल. आम्ही प्रादेशिक भाषा आणि बोली भाषेतील मजकूर लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांचे प्रेम आपल्याला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देते.

नीरज जोडला गेल्यानं हा ब्रँड आणखी मजबूत होणार

यावेळी बोलताना जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सचे सीओओ दिव्यांशु सिंग म्हणाले की, नीरज हा जागतिक स्तरावरील आयकॉन आणि स्पोर्ट्स सुपरस्टार आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळांमध्ये देशाचे नाव कमावले आहे. असे असूनही तो त्याच्या मातीशी जोडलेला आहे. त्यांच्याबरोबरची ही भागीदारी खूप महत्त्वाची ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे. गुंतवणूकदार म्हणून त्याचे आमच्याबरोबर सामील होणे हा ब्रँडसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय असेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Neeraj chopra olympic gold medalist neeraj chopra also entered the business world invested in startup stage ott app vrd

First published on: 28-11-2023 at 13:46 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×