New UPI Rule : देशातील कोट्यावधी यूपीआय युजर्ससाठी एक दिलासाजनक बातमी आहे. जर तुमचे यूपीआय ट्रान्झॅक्शन फेल झाले किंवा पैसे चुकूनही चुकीच्या यूपीआय आयडीवर ट्रान्सफर झाले तर तुम्हाला जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन (NPCI) द्वारे १५ जुलै २०२५ पासून एक नवीन नियम करण्यात येणार आहे. या नव्या नियमानुसार, जर एखाद्या यूपीआय अकाउंटमधून पैसे कापले गेले, पण पेमेंट झाले नाही तर युजरला तात्काळ रिफंड मिळेल.

नवीन नियम काय आहे?

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन (NPCI) च्या नव्या नियमानुसार, जर यूपीआय ट्रान्झॅक्शनदरम्यान तुमच्या अकाउंटमधून पैसे कापले गेले परंतु पेमेंट झाले नाही, तर ते पैसे ताबडतोब तुमच्या अकाउंटमध्ये परत केले जातील. तसेच जर तुम्ही चुकून चुकीच्या यूपीआय नंबरवर पैसे पाठवले असतील, तर आता तुम्ही तुमच्या बँकेकडून पैसै परत मागू शकता. बँका आता एनपीसीआयच्या पूर्व परवानगीशिवाय काही डिक्लाईन चार्जबॅक प्रकरणे स्वतःहून निकाली काढू शकतील.

नवीन नियमांमुळे जुन्या रिफंड प्रकरणांनाही फायदा होईल. अनेक युजर्सचे रिफंडचे दावे पूर्वी नाकारले गेले होते, जे आता बँकांकडून पुन्हा तपासले जाऊ शकतात. यामुळे आतापर्यंत त्यांचे पैसे परत मिळण्याची चिंता असलेल्या ग्राहकांना दिलासा मिळेल.

आतापर्यंत काय समस्या होती?

सध्याच्या प्रणालीनुसार, जर एखाद्या बँकेने UPI चार्जबँक विनंती नाकारली, तर NPCI प्रणाली आपोआप पुढील प्रक्रिया थांबवते. यासाठी बँकेला केस “व्हाइटलिस्ट” करण्यासाठी NPCI ला मॅन्युअली याचिका करावी लागते. ही प्रक्रिया खूप संथ आणि गुंतागुंतीची होती, ज्यामुळे ग्राहकांना पैसे रिफंड मिळण्यासाठी बराच वेळ वाट पहावी लागत होती. पण, आता या नवीन चार्जबँक प्रणालीमुळे ही प्रक्रिया खूपच जलद आणि सोपी होईल.

UPI द्वारे पेमेंट आता होणार आणखी जलद

१) एनपीसीआयने केवळ रिफंड प्रक्रियेतच सुधारणा केली नाही तर पेमेंटचा वेळही कमी केला आहे.

२) पूर्वी UPI द्वारे ट्रान्झॅक्शन करण्यासाठी ३० सेकंद लागायचे.

३) आता ही वेळ १० वरून १५ सेकंदांपर्यंत कमी करण्यात आली आहे.

४) हा बदल १६ जून २०२५ पासून लागू झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

UPI ट्रान्झॅक्शन प्रोसेस अधिक विश्वासार्ह आणि जलद करण्यासाठी NPCI ने बँका आणि पेमेंट अॅप्सना त्यांच्या सिस्टम्स अपग्रेड करण्याचे निर्देश दिले होते.