Nokia Layoffs : दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या नोकियाबद्दल मोठी बातमी आली आहे. त्यामुळे नोकिया कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. नोकियाला कपातीचा सामना करावा लागणार असून, या अंतर्गत कंपनी १४ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. नोकियाने तिसर्‍या तिमाहीतील निकालांमध्ये विक्री २० टक्क्यांनी घसरल्यानंतर खर्चात कपात करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून हा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या 5G उपकरणांच्या विक्रीच्या संथ गतीमुळे विक्रीत ही घट दिसून आली आहे.

खर्चात बचत करण्यासाठी नोकियाने हा निर्णय घेतला

इकॉनॉमिक टाइम्समधील एका बातमीनुसार, फिनिश टेलिकम्युनिकेशन्स इक्विपमेंट ग्रुपच्या नोकिया कंपनीचा अंदाज आहे की, २०२६ पर्यंत ८०० दशलक्ष ते १.२ अब्ज युरोच्या खर्चात बचत करू शकतात. या वेळेपर्यंत कंपनीने सुमारे १४ टक्के ऑपरेटिंग मार्जिन गाठणे अपेक्षित आहे. या अंतर्गत कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या ८६,००० वरून ७२,०००-७७,००० पर्यंत कमी करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

हेही वाचाः गौतम अदाणी सिमेंट व्यवसायात आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत, आता ‘या’ कंपनीला विकत घेण्याचा करार होण्याची शक्यता

नोकियाचे तिमाही निकाल कसे होते?

नोकियाने यंदा अपेक्षेपेक्षा कमी कामगिरी केली आहे. तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग नफा ४६७ दशलक्ष रुपये होता. त्यांची बदललेली कमाईदेखील प्रति शेअर ५ सेंटपर्यंत घसरली आहे तर विश्लेषकांनी अंदाजे ७ सेंट्सची कमाई केली आहे. याशिवाय कंपनीने दुसऱ्या तिमाहीतील विक्री मार्गदर्शन २४.६ अब्ज युरोवरून २३.२ अब्ज डॉलर्सपर्यंत कमी केले आहे. तसेच कंपनीने ऑपरेटिंग मार्जिन ११.५ टक्के ते १३ टक्क्यांदरम्यान असण्याचा अंदाज वर्तवला होता, तर आधी तो १४ टक्के असा अंदाज होता.

हेही वाचाः टाटांच्या एअर इंडिया एक्सप्रेसचा नवा अवतार उघड, आता ‘अशी’ दिसणार एअरलाइन्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यंदा 5G उपकरण निर्मात्यांसाठी आव्हानात्मक वातावरण

यूएस आणि युरोपियन युनियनने भांडवली खर्च कमी करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे 5G उपकरणे उत्पादकांना महसूल आणि नफ्याच्या आघाडीवर संघर्ष करावा लागत आहे. नोकियाने नुकताच आपला नवा लोगो प्रदर्शित केला असून, आज बार्सिलोना येथे होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसच्या अगोदरच आपला नवीन लोगो उघड केला आहे.