पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पु. ना. गाडगीळ आणि सन्सने ग्राहकांसाठी मंगळसूत्र महोत्सवाची घोषणा केली आहे. या उपक्रमांतर्गत सोन्याच्या आणि हिर्यांच्या मंगळसूत्रावर भव्य सवलत जाहीर करण्यात आली आहे. मंगळसूत्राच्या घडणावळीवर तब्बल ५० टक्क्यांपर्यंत सूट तसेच मंगळसूत्र खरेदीसोबत हिर्यांच्या पेंडंटच्या घडणावळीवर तब्बल १०० टक्के सूट अशी आकर्षक सवलत दिली आहे. हा मंगळसूत्र महोत्सव १७ ऑगस्ट २०२५ पर्यंत सर्व पु. ना. गाडगीळ आणि सन्स दालनांमध्ये सुरू राहणार आहे.
पिढ्यानपिढ्या विश्वास आणि गुणवत्तेची परंपरा जपणाऱ्या पु. ना. गाडगीळ आणि सन्ससाठी मंगळसूत्र ही केवळ दागिन्याची वस्तू नसून भारतीय संस्कृतीतील एक भावनिक आणि पवित्र बंधनाचे प्रतीक आहे. या महोत्सवाद्वारे प्रत्येक ग्राहकाला सुवर्ण आणि हिर्यांच्या दागिन्यांच्या अप्रतिम रचना अनुभवण्याची संधी मिळणार आहे, असे पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे प्रवर्तक अजित गाडगीळ म्हणाले. पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या दालनांना भेट देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
या महोत्सवात पारंपरिक डिझाईन्ससोबत आधुनिकतेचा संगम असलेल्या विविध प्रकारच्या मंगळसूत्रांच्या तसेच आकर्षक हिर्यांच्या पेंडंटच्या रचना ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, गार्गी आणि रेवा या नाममुद्रेअंतर्गत हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या अप्रतिम आणि आधुनिक डिझाईन्स विशेष सवलतीसह उपलब्ध आहेत.
या महोत्सवात पारंपरिक डिझाईन्ससोबत आधुनिकतेचा संगम असलेल्या विविध प्रकारच्या मंगळसूत्रांच्या तसेच आकर्षक हिर्यांच्या पेंडंटच्या रचना ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वधू-वरांपासून ते दैनंदिन वापरासाठी सोयीस्कर असलेल्या डिझाईन्सपर्यंत सर्व काही येथे एकाच छताखाली मिळणार आहे. सोने, चांदी आणि हिर्यांच्या दागिन्यांच्या खरेदीत पु. ना. गाडगीळ आणि सन्स नेहमीच ग्राहकांचा विश्वास संपादन करत आले आहेत. या महोत्सवाच्या निमित्ताने ग्राहकांना केवळ सवलतच नव्हे तर दर्जेदार सेवा आणि उत्कृष्टतेचा अनुभव देण्याचा उद्देश आहे.