रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने गुरुवारी बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांच्या (NBFC) असुरक्षित कर्ज वाटपाशी संबंधित नियम कडक केले आहेत. यानंतर १७ नोव्हेंबर रोजी SBI कार्ड, बजाज फायनान्स, HDFC बँक आणि ICICI बँकेसह टॉप बँकिंग आणि नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांचे शेअर्स ७ टक्क्यांपर्यंत घसरले आहेत. तर एसबीआय कार्डचे शेअर्स ७ टक्क्यांनी घसरून ७२०.४० रुपयांवर आले आहेत. तसेच बजाज फायनान्सचे शेअर्स ३ टक्क्यांनी घसरून ७१२२.०५ रुपयांवर आले, पेटीएमचे शेअर्स ४ टक्क्यांनी घसरून ८७०.२० रुपयांवर आले आहेत.
हेही वाचाः UAE मध्ये ५ भारतीयांना लागला जॅकपॉट अन् मिळाली बंपर रक्कम, ‘या’ भारतीयाने जिंकले ४५ कोटी रुपये
आरबीआयनं निर्बंध कडक का केलेत?
कर्जाची वाढ रोखण्यासाठी RBI ने कार्ड्सवरील नियम कडक केले आहेत. आरबीआयने अशा कर्जासाठी भांडवली आवश्यकता वाढवून असुरक्षित ग्राहक कर्जावरील क्रेडिट जोखीम निर्बंध आणखी कडक केले आहेत. भारतीय बँकांमध्ये असुरक्षित कर्जांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बहुतेक वैयक्तिक कर्जे आणि क्रेडिट कार्डे ज्यांनी गेल्या वर्षभरात एकूण बँक कर्जाच्या वाढीमध्ये सुमारे १५ टक्के वाढ केली आहे, त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) तिकडे लक्ष वेधले गेले आहे.
हेही वाचाः दिल्लीपासून मुंबईपर्यंत एलपीजी सिलिंडर झाले स्वस्त, नवे दर काय?
या कर्जांवर जोखमीचा बोजा वाढला नाही
याबरोबरच आरबीआयने सांगितले की, गृहनिर्माण, शिक्षण आणि वाहन कर्जाबरोबरच सोन्याचे दागिने सुरक्षित केलेले कर्ज यातून बाहेर ठेवले जाणार आहे. आरबीआयनं बँकांकडील ग्राहकांच्या कर्जावरील जोखीम भार १२५ टक्क्यांवरून १५० टक्क्यांपर्यंत वाढवले . NBFC ने ग्राहकांच्या कर्जावरील जोखीम भार १०० टक्क्यांवरून १२५ टक्के केला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की गृहनिर्माण, शिक्षण, वाहन आणि सोन्याचे आधार असलेले कर्ज वगळता बँका आणि NBFCs साठी ग्राहकांच्या कर्जावरील जोखीम भार पूर्वीच्या १०० टक्क्यांपेक्षा १२५ टक्के असेल.