मुंबई: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात ‘आयएमएफ’च्या ताज्या इशाऱ्याला धुडकावून लावत, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) तुलनेत देशावरील कर्जाचे प्रमाण हे उत्तरोत्तर घसरत जाणार असल्याचा दावा रिझर्व्ह बँकेच्या मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या पत्रिकेतील लेखाने दावा केला आहे. नाणेनिधीने भारताचे कर्ज-जीडीपी गुणोत्तर हे मध्यम कालावधीत चिंताजनक अशा १०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढू शकते, असा अलिकडेच दिलेल्या इशाऱ्याला अशा प्रकारे मध्यवर्ती बँकेने उत्तर दिले आहे.

हेही वाचा >>> विभोर स्टील ट्यूबचे दमदार पदार्पण; गुंतवणूकदारांना १९३ टक्क्यांच्या बहुप्रसवा परतावा

रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर मायकेल पात्रा हे सह-लेखक असलेला ‘द शेप ऑफ ग्रोथ कॉम्पॅटिबल फिस्कल कन्सोलिडेशन’ या शीर्षकाचा लेख मध्यवर्ती बँकेच्या मासिक पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. त्यात भारताचे कर्ज-जीडीपी गुणोत्तर २०२३-२४ मधील अंदाजे ८१.६ टक्क्यांच्या पातळीवरून २०३०-३१ पर्यंत ७३.४ टक्क्यांपर्यंत घसरेल, असा दावा करण्यात आला आहे. ‘आमच्या अनुमानानुसार असे दिसून आले आहे की, सामान्य सरकारी कर्ज-जीडीपी गुणोत्तर हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालात निर्धारित केलेल्या अंदाजित पातळीपेक्षा कमी राहणे शक्य आहे,’ असे या लेखात म्हटले आहे. मंगळवारी प्रसिद्ध झालेला हा लेख मध्यवर्ती बँकेच्या फेब्रुवारीच्या मासिक पत्रिकेचा भाग म्हणून प्रकाशित झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा >>> Stock Market Today : निर्देशांकांची उच्चांकी दौड कायम;निफ्टी २२,२०० पुढील पातळीवर टिकून

या संदर्भात, ‘मध्यम कालावधीत सरकारची उसनवारी ही देशाच्या जीडीपीपेक्षा वरचढ ठरेल आणि त्यामुळे आणखी कठोर वित्तीय शिस्तीचे अनुसरण करणे आवश्यक ठरेल, अशा तऱ्हेने ‘ऐतिहासिक धक्का वास्तवरूपात येईल’ असा नाणेनिधीने दिलेला इशारा आम्ही स्पष्टपणे नाकारतो,’ असे या लेखातून प्रत्युत्तर देण्यात आले आहे