पीटीआय, मुंबई
महागाई नियंत्रणासाठी अनेक विळा विकासाकडे दुर्लक्ष केले जाते. त्यातून किंमत स्थिरता आणि विकास यातील असंतुलन निर्माण होते, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मंगळवारी केले.

नेपाळ राष्ट्र बँकेच्या वतीने आयोजित हिमालय शमशेर स्मृती व्याख्यानात दास बोलत होते. ते म्हणाले की, महागाई नियंत्रण आणि विकास यातील असंतुलन टाळून अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी मध्यवर्ती बँकांना अनेक साधनांचा वापर करावा लागतो. त्यात पतधोरण, वित्तीय व्यवस्थेतील धोके टाळण्यासाठी नियमन आणि पुरेसा भांडवलाचा ओघ कायम राखण्यासाठी देखरेख या गोष्टींचा समावेश आहे. महागाई नियंत्रणासाठी विकासाचा बळी दिल्यास त्यात असंतुलन निर्माण होते. त्यातून वित्तीय स्थिरतेलाही धोका निर्माण होऊ शकतो. काही विकसित अर्थव्यवस्थांमध्ये अलिकडच्या काळात अशी उदाहरणे दिसून आली. तेथील बँकिंक व्यवस्थेच्या स्थिरतेबाबत चिंतानजक स्थिती निर्माण झाली होती.

हेही वाचा >>>Personal Loans : भारतात पर्सनल लोनच्या मागणीत प्रचंड वाढ! गुगल ट्रेंड काय सांगतोय? कोणत्या बँका देतात स्वस्तात कर्ज? वाचा सविस्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताचा विचार करता महागाई नियंत्रणाच्या पलिकडेही रिझर्व्ह बँकेची अनेक कार्ये आहेत. त्यात वित्तीय स्थिरता कायम राखण्याचा समावेश आहे. अर्थव्यवस्थेचा सर्वांगीँण विचार करून विविध साधनांचा योग्य पद्धतीने वापर केला जात आहे. रिझर्व्ह बँकेने उचललेली अर्थव्यवस्थेसाठी चांगली ठरली आहेत. गेल्या काही वर्षांतील धक्क्यांपासून अर्थव्यवस्थेचे संरक्षण आणि तिला भक्कम करण्यात धोरणकर्ते यशस्वी ठरले आहेत, असे दास यांनी नमूद केले.