मुंबई : रिझर्व्ह बँकेने गुरुवारी पुण्यात मुख्यालय असलेली आघाडीची बँकेतर वित्तीय कंपनी – बजाज फायनान्सला तिच्या दोन डिजिटल धाटणीच्या कर्ज योजनांतर्गत नवीन कर्ज मंजुरी आणि वितरण थांबवण्याचे निर्देश त्वरित प्रभावाने मागे घेतले. १५ नोव्हेंबर २०२३ रोजी रिझर्व्ह बँकेने डिजिटल कर्जविषयक मार्गदर्शक तत्त्वे आणि आवश्यक तरतुदींचे पालन न केल्यामुळे ‘ईकॉम’ आणि ‘इन्स्टा ईएमआय कार्ड’ या कंपनीच्या दोन योजनांवर निर्बंध घातले होते.

हेही वाचा >>> Googleने कोअर टीममधील ‘इतक्या’ कर्मचाऱ्यांना दिला नारळ, पण भारतीयांसाठी सुवर्णसंधी!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता हे निर्बंध हटवल्याने ‘ईएमआय कार्ड’ वितरणासह या दोन्ही व्यवसाय विभागांमध्ये नवीन कर्ज मंजुरी आणि वितरण पुन्हा सुरू करता येईल. गुरुवारीदिवसअखेर बजाज फायनान्सचा समभाग ४०.८५ रुपयांच्या घसरणीसह ६,८८२.७० रुपयांवर बंद झाला. मात्र सायंकाळी उशिराने निर्बंध मागे घेतल्याचे रिझर्व्ह बँकेचा आदेश आल्याने, शुक्रवारच्या सत्रात समभागावर याचे सकारात्मक पडसाद उमटण्याची शक्यता आहे.