वृत्तसंस्था,

मुंबई : म्युच्युअल फंडाची शिखर संस्था असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाने (ॲम्फी) म्युच्युअल फंड घराण्यांना जाहिरातींमध्ये भविष्यातील परतावा दर्शवू शकत नसल्याचे सांगितले आहे. याचबरोबर परतावा कामगिरी दर्शविण्यासाठी केवळ १० वर्षे कालावधीचा सरासरी वार्षिक (कम्पाउंड ॲन्युअल ग्रोथ रेट – सीएजीआर) परतावा दर्शविण्यास सांगितले आहे.

देशातील काही म्युच्युअल फंड घराणे ‘सेबी (म्युच्युअल फंड) विनियम, १९९६’मध्ये विहित केलेल्या जाहिरात संहितेतील तरतुदींचे पालन न करता जाहिराती प्रसिद्ध करत असल्याचे भांडवली बाजार नियामक ‘सेबी’च्या निदर्शनास आल्यानंतर ‘ॲम्फी’ने जाहिरातींमध्ये अनुसरण करण्याच्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल नवीन मार्गदर्शक तत्त्वे शुक्रवारी जाहीर केली.

आणखी वाचा-जागतिक अनुकूलतेने ‘सेन्सेक्स’मध्ये २८३ अंशांची भर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही म्युच्युअल फंड घराण्यांच्या जाहिराती, सादरीकरणे, माहितीपत्रके यामध्ये गुंतवणूकदारांना एसआयपीच्या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीवर निश्चित परतावा मिळेल असे दर्शवीत असल्याचे सेबीच्या निदर्शनास आले. शिवाय काही उदाहरणांमधून भविष्यातील गुंतवणुकीवरील परतावादेखील उच्च दर्शविल्याची सेबीने नोंद घेतली आहे.