मुंबई : चुकीच्या धोरणांमुळे बँकांपुढे मोठे संकट निर्माण होऊ शकते, हे पाहता देशाच्या बँकांच्या व्यवसाय प्रारुपावर रिझर्व्ह बँकेचे बारकाईने लक्ष आहे, असा निर्वाळा गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी येथे दिला.

एका कार्यक्रमात बोलताना दास म्हणाले की, नजीकच्या काळातील चिंताजनक घडामोडी या अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक बुडाल्यानंतर सुरू झाल्या. संपूर्ण व्यवस्थेवर आलेला ताण कमी करण्यासाठी खूपच धावाधाव करावी लागली. सदोष व्यवसाय प्रारुपामुळेच हे संकट निर्माण झाले असण्याची शक्यता आहे. काही विकसित अर्थव्यवस्थांमध्ये नजीकच्या काळात वित्तीय अस्थिरतेचे प्रकार दिसून आले. त्याचा भारतीय बँकांवर प्रतिकूल परिणाम झालेला नाही. भारतीय बँका व्यवस्थितपणे कार्य करीत आहेत.

हेही वाचा – ‘इन्कोव्हॅक’ लस आजपासून; मुंबई महापालिकेतर्फे २४ केंद्रांवर नाकाद्वारे लसीकरण

अमेरिकेतील अलीकडच्या या घडामोडी पाहता अडचणीत आलेल्या बँकांची व्यवसाय पद्धती योग्य की अयोग्य असा मुद्दाही उपस्थित झाला होता. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने भारतीय बँकांच्या व्यवसाय प्रारुपाला बारकाईने तपासण्यास सुरुवात केली आहे. त्यात जर त्रुटी राहिल्यास त्यातून संकट निर्माण होऊ शकते, असे दास यांनी सांगितले.

अनुत्पादित कर्जांमध्ये घटबँकांच्या एकूण अनुत्पादित कर्जाचे प्रमाण कमी होऊन डिसेंबर २०२२ मध्ये ४.४१ टक्क्यांवर आले. ते मार्च २०२२ मध्ये ५.८ टक्के, तर मार्च २०२१ मध्ये ७.३ टक्के होते. भारतीय बँकांकडील भांडवल उपलब्धता डिसेंबर २०२२ अखेर १६.१ टक्के होती. किमान गरजेपेक्षा हे प्रमाण जास्त आहे, असे शक्तिकांत दास यांनी नमूद केले.

हेही वाचा – मुंबई :‘बेस्ट’मध्ये मोबाइलचा मोठा आवाज बंद !स्पीकरवर गप्पा, गाणी ऐकल्यास पोलिसांत तक्रार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बँकेच्या व्यवसाय पद्धतीमुळे तिच्या ताळेबंदातील काही भागांत जोखीम निर्माण होऊ शकते. त्यातूनच पुढे जाऊन मोठे संकट निर्माण होते, असे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले.