मुंबई : बाजार नियामक ‘सेबी’ झी एंटरटेन्मेंट लिमिटेडमधील निधी अन्यत्र वळवण्याच्या चौकशीचा विस्तार करत, कंपनीच्या अनेक माजी संचालकांना थेट समन्स पाठवले असल्याचे बुधवारी या घडामोडीच्या जाणकार सूत्रांनी स्पष्ट केले. अलीकडच्या वर्षांत कंपनीसोबत व्यवसाय करणाऱ्या संस्थांचीही छाननी केली जात असल्याचे समजते.

झीने यापूर्वी आर्थिक अनियमिततेचे आरोप खोटे असल्याचे सांगत ते फेटाळून लावले असले तरी नियामकांकडून झी आणि तिच्या प्रवर्तकांच्या मालकीच्या खासगी कंपन्यांमधील व्यवहारांची विस्तृतपणे छाननी केली जात आहे. ‘आतापर्यंत, दोन माजी स्वतंत्र संचालकांना ‘सेबी’पुढे हजर राहून साक्ष देण्यास सांगण्यात आले आहे,” असे सूत्रांनी सांगितले. उल्लेखनीय म्हणजे या दोन्ही संचालकांनी २०२१ च्या सुमारास कंपनीचे संचालकपद सोडलेले आहे.

cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
narendra modi sanjay singh
“तोट्यातल्या कंपन्यांकडून भाजपाला कोट्यवधींचं दान, काही कंपन्यांकडून नफ्याच्या ९३ पट देणग्या”, निवडणूक रोख्यांवरून आपचे गंभीर आरोप
Shareholders approve Voda Idea Rs 20000 crore fund raising
व्होडा-आयडियाच्या २०,००० कोटींच्या निधी उभारणीला भागधारकांची मंजुरी
Ambala Divisional Commissioner Renu Phulia
महिला आयएएस अधिकाऱ्याने २० वर्षांपूर्वीची स्थगिती उठवली, नवरा आणि मुलाने लगेचच खरेदी केला भूखंड

हेही वाचा >>> Gold-Silver Price on 21 February 2024: सोने किमतीबाबत मोठी अपडेट, चांदीच्या दरात वाढ, मुंबई-पुण्यात भाव काय?

नियामकांनी तपासाची व्याप्ती देखील वाढवली आहे आणि अलीकडच्या वर्षांत झी एंटरटेन्मेंटसोबत व्यवसाय करणाऱ्या संस्थांचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे, मुंबईस्थित दोन मालिका निर्मिती संस्थांच्या भूमिकेकडे नियामकांकडून बारकाईने तपास सुरू आहे. त्यांच्या माध्यमातून कंपनीने निधी अन्यत्र वळता केला असल्याचा संशय आहे. झीच्या संस्थापकांच्या यापूर्वी झालेल्या चौकशीदरम्यान, नियामकांनी कंपनीकडून अंदाजे २,००० कोटी रुपये अन्य कंपन्यांमध्ये वळवले गेल्याचे आढळून आले आहे.

त्या संबंधाने कारवाई म्हणून झीचे संस्थापक सुभाष चंद्रा आणि त्यांचा मुलगा पुनित गोयंका यांना कोणत्याही कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक पद स्वीकारण्यास प्रतिबंध करणारा आदेश सेबीने बजावला आहे. आता चौकशी व्याप वाढवताना, आधीच्या चौकशीत आढळलेली गैरव्यवहाराची रक्कम अंतिम नाही आणि पुनरावलोकनानंतर ती बदलू शकते, असे सूत्रांचे संकेत आहेत. तथापि, कंपनीच्या प्रवक्त्याने लेखाविषयक गैरव्यवहाराचे वृत्त ‘खोटे आणि निराधार’ असल्याचा पुनरुच्चार केला आहे. सेबीने विनवणी केलेल्या सर्व टिप्पण्या, माहिती किंवा स्पष्टीकरणे देण्याची प्रक्रिया कंपनीकडून सुरू आहे आणि नियमकांना सर्व पैलूंवर संपूर्ण सहकार्य केले जात असल्याचे प्रवक्त्याने सांगितले.

हेही वाचा >>> ‘पेटीएम संकटा’च्या पार्श्वभूमीवर मंथन…अर्थमंत्र्यांची ‘फिनटेक’ कंपन्यांच्या प्रमुखांसह येत्या आठवड्यात बैठक

समभागाची १५ टक्क्यांनी आपटी

कंपनीच्या खतावण्यांमध्ये आर्थिक अनियमितता आढळल्याच्या वृत्तामुळे झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायझेस लिमिटेडचा समभाग बुधवारी १५ टक्क्यांनी आपटला. बीएसईवर कंपनीचा समभाग १४.७७ टक्क्यांनी गडगडून १६४.५० रुपयांवर बंद झाला. मंगळवारी, झी आणि सोनी यांच्यात विलीनीकरणासाठी नव्याने वाटाघाटी सुरू होत असल्याच्या वृत्ताने झीचा समभाग ८ टक्क्यांनी उसळला होता. त्याआधी दोन वर्षे रखडलेले विलीनीकरण फिस्कटल्याच्या बातमीने समभागात मोठी घसरण सुरू होती.