पीटीआय, नवी दिल्ली

खाणकाम क्षेत्रातील वेदान्त लिमिटेडच्या पोलाद, तेल आणि वायू, वीज आणि स्टील या पाच प्रमुख व्यवसाय विलगीकरण करण्याच्या प्रस्तावाला कंपनीचे भागधारक आणि कर्जदारांकडून मान्यता मिळाली असल्याचे कंपनीने बाजारमंचांना कळवले आहे.

वेदान्त लिमिटेडच्या ९९.९९ टक्के भागधारकांनी, ९९.५९ टक्के सुरक्षित (सिक्युअर्ड) कर्जदारांनी आणि ९९.९५ टक्के असुरक्षित (अनसिक्युअर्ड) कर्जदारांनी विलगीकरणाच्या बाजूने मतदान केले आहे. कंपनीने भांडवली बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, कंपनी सहा स्वतंत्र सूचिबद्ध कंपन्यांची आखणी करत आहे. परिणामी वेदान्तच्या विद्यमान भागधारकांनी धारण केलेल्या प्रत्येक समभागाच्या बदल्यात वेगवेगळ्या पाच कंपन्यांचा प्रत्येकी एक समभाग मिळणार आहे.

पाच प्रमुख व्यवसायांचे विलगीकरण करून, त्या प्रत्येक व्यवसायासाठी स्वतंत्र कंपनी निर्माण करून ती सूचिबद्ध करण्याची घोषणा केली. या योजनेच्या अंमलबजावणीनंतर वेदान्त समूहाच्या सहा सूचिबद्ध कंपन्या भांडवली बाजारात असतील. भागधारकांच्या गुंतवणुकीचे मूल्यवर्धन करण्यासाठी आणि व्यवसायानुरूप सुसूत्रीकरणासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

खाणकाम क्षेत्रातील वेदान्त जस्त, चांदी, शिसे, ॲल्युमिनियम, क्रोमियम, तांबे, निकेल यांच्या उत्खननांत कार्यरत आहे. याचबरोबर तेल आणि वायू, पोलाद, स्टील, वीज, कोळसा आणि अक्षय्य ऊर्जेसह विविध क्षेत्रात वेदान्त पॉवर तिचा व्यवसाय विस्तार आहे. कंपनी आता सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले ग्लासच्या निर्मितीमध्ये प्रवेश करत आहे. कंपन्या विलग झाल्यानंतर, प्रत्येक सूचिबद्ध कंपनीला स्वतंत्र व्यवस्थापन, भांडवल उपलब्ध होईल. शिवाय संभाव्य आणि वास्तविक मूल्यापर्यंत वाढण्याचे अधिक स्वातंत्र्य असेल. प्रत्येक कंपनीची स्वतःची बाजारपेठ, मागणी-पुरवठा आणि तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादकता वाढवण्याची क्षमता आहे.

‘वेदान्त’च्या संभाव्य सहा स्वतंत्र सूचिबद्ध कंपन्या

– वेदान्त ॲल्युमिनियम

– वेदान्त ऑइल ॲण्ड गॅस

– वेदान्त पॉवर

– वेदान्त स्टील ॲण्ड फेरस मटेरीअल

– वेदान्त बेस मेटल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– वेदान्त लिमिटेड