Spotify HR On Work From Anywhere : जगभरातील दिग्गज कंपन्या एककडे आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयातून काम करण्याची सक्ती करत असताना ऑनलाइन म्युझिक प्लॅटफॉर्म स्पॉटिफाय मात्र त्यांच्या ‘Work From Anywhere’ पॉलिसीवर ठाम असून, याचे त्यांनी समर्थन केले आहे.

जगातील सर्वात मोठी म्युझिक-स्ट्रीमिंग कंपनी असलेल्या स्पॉटिफायच्या प्रमुख एचआर कॅटरिना बर्ग यांनी स्पष्ट केले आहे की, “प्रौढ कर्मचाऱ्यांबरोबर काम करतात त्यांना लवचिकता आणि स्वातंत्र्य देण्याची गरज आहे.” त्याचबरोबर त्यांनी, “कर्मचाऱ्यांना मुलांसारखे वागवू शकत नाही”, असे म्हटले आहे.

unemployed engineers protested by displaying degrees and building certificate pylon at office entrance
बेरोजगार अभियंत्यांचा असाही निषेध, कामे मिळत नसल्याने पदव्या भिरकावल्या ,तोरण लावले
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
pune teachers appointment news in marathi
राज्यातील पात्रताधारकांना दिलासा… कंत्राटी शिक्षक नियुक्तीचा निर्णय रद्द
Infosys terminates over 400 trainees in Mysuru
इन्फोसिसचे ‘लेऑफ’बद्दल म्हणणे काय…?
personal assistant Bhushan Gagrani nashik a person cheated unemployed people government job nashik
भूषण गगरानी यांचे स्वीय सहायक असल्याचे सांगून बेरोजगारांची फसवणूक, शासकीय नोकरीचे आमिष
Will not be forgiven if entrepreneurs are troubled says Devendra Fadnavis
उद्योजकांना त्रास झाल्यास क्षमा केली जाणार नाही… मुख्यमंत्र्यांनी कुठल्या नेत्यांना दिला इशारा!
Marathi mandatory in government offices news in marathi
सरकारी कार्यालयात ‘मराठीतच बोला!’ कर्मचारी मराठीत न बोलल्यास शिस्तभंगाची कारवाई
Police officer beats up police inspector in nagpur
पोलीस निरीक्षकाला दिला कर्मचाऱ्याने चोप

कर्मचाऱ्यांना मुलासारखे वागवू शकत नाही

या प्रकरणावर बोलताना स्पॉटिफायच्या प्रमुख एचआर म्हणाल्या की, “तुम्ही कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आणि त्यांना मुलांसारखे वागवण्यात जास्त वेळ घालवू शकत नाही. आम्ही अशा व्यवसायात आहोत, जो जन्मापासूनच डिजिटल आहे. मग आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना काम करताना लवचिकता आणि स्वतंत्र्या का देऊ नये? ” रॅकोन्टेअरशी बोलताना कॅटरिना बर्ग यांनी हे विधान केले आहे.

‘वर्क फ्रॉम एनीव्हेअर’मुळे कार्यक्षमतेवर परिणाम नाही

बर्ग पुढे म्हणाल्या की, “काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना पुन्हा कार्यालयातून काम करण्याची सक्ती केली आहे. त्यांनी असे का केले हे त्यांनाच ठावूक. पण, ही सक्ती स्पॉटिफायच्या कर्मचाऱ्यांवरही करण्याचे कारण मला अद्याप सापडेल नाही. विशेष म्हणजे कंपनीने वर्क फ्रॉम एनीव्हेअर धोरण लागू केल्यापासून उत्पादकता किंवा कार्यक्षमतेवर कोणताही परिणाम झालेला नाही.”

स्पॉटिफाय व्हर्च्युअल पद्धतीने काम करण्याच्या परिणामांवर अधिक संशोधन करण्यासाठी स्टॉकहोम स्कूल ऑफ इकॉनॉमिक्ससोबत काम करत आहे, असेही रॅकोन्टेअरने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

हे ही वाचा : Nitin Gadkari : मोठी बातमी! रस्ते अपघात पीडितांना आता मिळणार कॅशलेस उपचार, नितीन गडकरींची घोषणा

१५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

दरम्यान, स्पॉटिफायने डिसेंबरमध्ये १,५०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले, ज्यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या १७ टक्क्यांनी कमी झाली आहे, असे वृत्तात म्हटले आहे. वाढत्या व्याजदरांमुळे आणि नफा टिकवून ठेवण्यासाठी गुंतवणूकदारांनी कर्मचारी कपातीचा आग्रह धरला होता. त्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा : “सात महिन्यांपासून तुरुंगात, भारतीय दूतावासातून कोणी…”, गुरपतवंत पन्नूच्या हत्येच्या कटाचा आरोप असलेल्या निखिल गुप्तांची मोठी माहिती

स्वीडिश उद्योजक डॅनियल एक आणि मार्टिन लॉरेंटझॉन यांनी २००८ मध्ये स्पॉटिफायची निर्मिती केली. तेव्हापासून, स्पॉटिफाय जगातील सर्वात लोकप्रिय ऑनलाइन म्युझिक स्ट्रीमिंग सेवा बनली आहे. जगभरातील करोडो लोक रोज स्पॉटिफायवर गाणी ऐकतात.

Story img Loader