scorecardresearch

Premium

तैवानचा चीनला पुन्हा धक्का, भारतात खर्च करणार १३ हजार कोटी रुपये

Hon Hai म्हणजेच Foxconn आणि इतर तैवानच्या कंपन्या अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे चीनबाहेर त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Taiwan shocks China
(फोटो क्रेडिट- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

तैवानने पुन्हा एकदा चीनला मोठा धक्का दिला आहे. तैवानची कंपनी होन हाय ज्याला फॉक्सकॉन म्हणूनही ओळखले जाते, ती भारतात १.६ अब्ज डॉलर्स म्हणजेच १३ हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. ही गुंतवणूक बांधकाम प्रकल्पांमध्ये असेल. सोमवारी उशिरा तैवानमधील एक्सचेंज फायलिंगमध्ये ही घोषणा करण्यात आली आहे. ही गुंतवणूक केवळ ऑपरेशनल गरजा पूर्ण करण्यासाठी केली जात असल्याचे सांगितले. कंपनीच्या प्रवक्त्याने नवीन सुविधा कुठे असतील आणि तिथे काय बांधले जाणार हे सांगण्यास नकार दिला.

फॉक्सकॉनचा निम्मा महसूल अ‍ॅपलकडून येतो

Hon Hai म्हणजेच Foxconn आणि इतर तैवानच्या कंपन्या अमेरिका आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे चीनबाहेर त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. फॉक्सकॉनच्या कमाईपैकी अर्धा हिस्सा Apple Inc सह व्यवसायातून येतो. कंपनी अनेक वर्षांपासून भारतात आयफोन आणि इतर उत्पादनांची निर्मिती करीत आहे. ज्यामध्ये iPhone १५ देखील समाविष्ट आहे. सप्टेंबरमध्ये फॉक्सकॉनच्या भारतातील प्रतिनिधीने LinkedIn वर सांगितले की, तैवानची कंपनी भारतातील आपल्या व्यवसायाचा आकार दुप्पट करण्याचा विचार करीत आहे.

मुंबई : रस्ते फर्निचर कामासाठी नव्याने निविदा प्रक्रिया?लोकायुक्तांकडे सुनावणी सुरू असताना २११ कोटींचा नवा प्रस्ताव
AI killing tech jobs
AI मुळे नोकऱ्या जाणार की वाढणार? आयबीएम इंडियाचे प्रमुख काय म्हणतात नक्की वाचा!
Industry in Chakan
पिंपरी : चाकणमधील उद्योग बाहेर जाण्याच्या पवित्र्यात? काय आहे नेमके कारण?
share market 1
अर्थसंकल्पापूर्वीच बाजार घसरला, तोट्यात सुरू झाला, पेटीएमचा स्टॉक उघडताच कोसळला

हेही वाचाः अखेर अश्नीर ग्रोवर यांनी न्यायालयात मागितली माफी, २ लाख रुपयांचा दंड का ठोठावण्यात आला?

अनेक कारखाने सुरू आहेत

भारताच्या कर्नाटक राज्य सरकारने ऑगस्टमध्ये घोषणा केली की, फॉक्सकॉनने दक्षिण भारतातील दोन घटक कारखान्यांवर ६०० दशलक्ष डॉलर गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. यामध्ये iPhones साठी यांत्रिक घटक बनवणारा प्लांट आणि Applied Materials Inc सह काम करणार्‍या सेमीकंडक्टर इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचा समावेश आहे. फॉक्सकॉन भारतात आधीपासून ९ प्रोडक्शन कॅम्पस आणि ३० पेक्षा जास्त कारखाने चालवते, हजारो लोकांना रोजगार देते. यामध्ये दरवर्षी सुमारे १० अब्ज डॉलर्सचा महसूल मिळतो.

हेही वाचाः Neeraj Chopra : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांचाही व्यावसायिक जगतात प्रवेश, ‘या’ स्टार्टअपमध्ये केली गुंतवणूक

अमेरिका-चीन तणावाचा भारताला फायदा होतो

सध्या अमेरिका आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. याचा फायदा भारताला मिळू लागला आहे. यामुळेच अॅपलने चीनमधून आपला व्यवसाय मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आपला व्यवसाय भारतात हलवण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी तैवानलाही चीनने खूप त्रास दिला आहे. यामुळेच अनेक तैवानच्या कंपन्या चीन सोडून सेमीकंडक्टर प्लांट्ससाठी भारताकडे जात आहेत. अशीच गती कायम राहिल्यास भारत लवकरच जगातील सर्वात मोठा कारखाना बनेल. जो एकेकाळी चीन असायचा.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Taiwan shocks china again will spend 13 thousand crore rupees in india vrd

First published on: 28-11-2023 at 15:13 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×