मुंबई : टाटा समूहातील अग्रणी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात टीसीएसचा एकत्रित निव्वळ नफा जानेवारी ते मार्च तिमाहीत ९.१ टक्के वाढीसह १२,४३४ कोटी रुपयांवर पोहोचला असल्याचे कंपनीकडून शुक्रवारी जाहीर करण्यात आले.

गेल्या वर्षी जानेवारी ते मार्च २०२३ या तिमाहीत कंपनीने ११,३९२ कोटी रुपये नफा मिळवला होता. मार्च तिमाहीत कंपनीचा महसूल ३.५ टक्क्यांनी वाढून ६१,२३७ कोटी रुपयांवर गेला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने ५९,१६२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला होता. तसेच सरलेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२३-२४ मध्ये कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा ९ टक्क्यांनी वाढून ४५,९०८ कोटी रुपये झाला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रतिसमभाग २८ रुपयांचा अंतिम लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे.

devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
shalini patil vishal patil
शालिनी पाटलांनी नातू विशाल पाटलांचे कान टोचले, अपक्ष लढण्याच्या चर्चेवर म्हणाल्या, “घरातल्या कार्यालयात बसून…”
What Prithviraj Chavan Said About Modi?
पृथ्वीराज चव्हाण यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल, “दगडात देव असतो का?, भावनिक करुन..”
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”

हेही वाचा…व्होडा-आयडियाची समभाग विक्रीतून १८,००० कोटी उभारण्याची घोषणा, १८ एप्रिलपासून प्रति समभाग १०-११ रुपयांनी विक्री

कंपनीने सरलेल्या चौथ्या तिमाहीत भरीव कामगिरी केली आहे. नवीन कार्यादेश, विविध उत्पादने आणि अविवासोबत मोठ्या करारनाम्यासह उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये तिची चमकदार कामगिरी राहिली. आव्हानात्मक वातावरणातही संशोधन आणि नवकल्पना यांमधील दीर्घकालीन गुंतवणुकीवर कंपनी टिकून राहिली. आगामी काळातदेखील वाढीच्या संधी साधण्यासाठी कार्यक्षमता आणि स्पर्धात्मकता वाढवण्यावर भर राहील, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कार्यकारी संचालक एन. गणपती सुब्रमण्यम म्हणाले.

हेही वाचा…सोन्याची विक्रमी तेजीची दौड कायम, जागतिक बाजारात प्रति औंस २,४००.३५ डॉलरचा उच्चांक

दिवसअखेर मुंबई शेअर बाजारात टीसीएसचा समभाग ०.४२ टक्क्यांनी वधारून ४००१.४० रुपयांवर बंद झाला. सध्याच्या समभागांच्या बाजारभावानुसार, कंपनीचे १४.४७ लाख कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.

कर्मचारी संख्या घटली

टीसीएसची कर्मचारी संख्या भांडवली बाजारात २००४ मध्ये सूचिबद्ध झाल्यापासून १९ वर्षांत प्रथमच घटली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात कर्मचारी संख्या १३,२४९ ने कमी झाली आहे. तर सरलेल्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी-मार्चमध्ये १,७५९ कर्मचाऱ्यांची घट झाली. ३१ मार्च २०२४ अखेर कंपनीमध्ये एकूण ६,०१,५४६ कमर्चारी कार्यरत असून १५२ देशांमध्ये कंपनीची उपस्थिती आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये ३५.६ टक्के महिला कर्मचारी आहेत. ॲट्रिशन रेट अर्थात कर्मचारी गळतीचे प्रमाण १२.५ टक्क्यांवर घसरले आहे. कंपनीने वार्षिक वेतनवाढीची घोषणा केली असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी दुहेरी-अंकातील वेतनवाढ मिळेल, अशी माहिती मुख्य मानव संसाधन अधिकारी मिलिंद लक्कड यांनी दिली.