मुंबई: देशातील सर्वात मोठय़ा माहिती-तंत्रज्ञान सेवा निर्यातदार टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेसने (टीसीएस) सोमवारी डिसेंबर तिमाहीत, परकीय चलन विनिमय मूल्य आणि व्यवसायातील वाढीच्या पार्श्वभूमीवर निव्वळ नफ्यात ११ टक्क्यांची वाढ नोंदविली आणि तो १०,८४६ कोटी रुपये नोंदविला. कंपनीने वर्षभरापूर्वी याच तिमाहीत ९,७६९ कोटी रुपयांचा करोत्तर निव्वळ नफा नोंदविला होता.

चांगल्या निकालाबाबत आशावादाने, सोमवारी टीसीएसच्या समभागांत दमदार खरेदी होऊन, त्याने ३.३५ टक्क्यांच्या वाढीसह ३,३१९.७० रुपयांची पातळी गाठली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टाटा समूहातील या कंपनीने आर्थिक वर्षांच्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीच्या निकालाच्या हंगामाची सुरुवात सोमवारी सायंकाळी अपेक्षेपेक्षा सरस कामगिरी जाहीर करून केला. तिमाहीत कंपनीचा एकूण महसूल १९.१ टक्क्यांनी वाढून ५८,२२९ कोटी रुपयांवर गेला आहे, जो मागील वर्षी याच तिमाहीत ४८,८८५ कोटी रुपये होता. स्थिर चलनात, महसुलातील वाढ १३.५ टक्के आहे आणि डॉलरच्या प्रमाणात तो ८ टक्क्यांनी घसरला असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. तिमाहीत कंपनीचे नफ्याचे मार्जिन अर्धा टक्क्याने घटून २४.५ टक्क्यांवर आले आहे.