टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडिया एक्सप्रेसचे नवीन डिझाइन, रंग आणि वैशिष्ट्ये समोर आली आहेत. आता ही एअरलाइन्स नव्या स्टाइलमध्ये पाहायला मिळणार आहे. एअर इंडिया एक्सप्रेसच्या नवीन रंगांमध्ये नीलमणी आणि केशरी रंगांचा समावेश आहे. एअर इंडिया एक्सप्रेस सध्या एआयएक्स कनेक्ट स्वतःमध्ये विलीन करण्याच्या प्रक्रियेत आहे.

मुंबई विमानतळावर एअर इंडियाचं हे नवीन डिझाइन लॉन्च करण्यात आले आहे. दोन महिन्यांपूर्वीच एअर इंडियाने आपल्या नवीन ब्रँड ओळखीचे अनावरण केले होते, त्यानंतर आता त्याच्या नवीन डिझाइन आणि रंग उघड करण्यात आले आहे. पीटीआयच्या मते, एअर इंडिया एक्सप्रेसने सांगितले की, एअरलाइन्सच्या नवीन डिझाइनमध्ये ऑरेंज आणि एक्सप्रेस प्रीमियम कलर पॅलेट आहे, ज्यामध्ये एक्सप्रेस आइस ब्लू रंगांचाही समावेश आहे.

हेही वाचाः विप्रोच्या ५ उपकंपन्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार; मूळ कंपनीने विलीनीकरणाची केली घोषणा

एअरलाइन्सच्या म्हणण्यानुसार, पहिल्या नवीन बोईंग ७३७-८ विमानाची बॉडी नवीन डिझाइनपासून प्रेरित आहे. आगामी विमानांमध्ये अजराख, पटोला, कांजीवरम, कलमकारी इत्यादींसह इतर पारंपरिक नमुन्यांद्वारे प्रेरित डिझाइन्स पाहायला मिळणार आहेत, जे भारतातील विविधता प्रदर्शित करतात. एअरलाइन्सची पॅटर्न ऑफ इंडिया थीम राष्ट्राची भावना प्रतिबिंबित करते. एअर इंडिया एक्सप्रेसचे व्यवस्थापकीय संचालक आलोक सिंग म्हणाले की, री ब्रँडिंग आधुनिक इंधन कार्यक्षम बोईंग बी ७३७-८ विमानांच्या समावेशासह त्याच्या महत्त्वाकांक्षी वाढ आणि परिवर्तनाच्या प्रवासात एक नवीन टप्पा दर्शवते.

हेही वाचाः Money Mantra : सणासुदीच्या काळात सोन्यात गुंतवणुकीचा सर्वोत्तम मार्ग कोणता? ‘हे’ चार पर्याय ठरणार फायदेशीर, जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या १५ महिन्यांत ताफ्यात ५० विमानांचा समावेश करण्याची तयारी सुरू आहे. आलोक सिंग म्हणाले की, पुढील पाच वर्षांमध्ये देशांतर्गत भारत आणि कमी अंतराच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पसरलेल्या नेटवर्कसह सुमारे १७० नॅरो बॉडी विमानांचा ताफा विकसित करण्याचे आमचे ध्येय आहे. एअर इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन म्हणाले की, एअर इंडिया एक्सप्रेस आणि एअरएशिया इंडियाचे विलीनीकरण आता अंतिम टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत विमान कंपनीने डिझाइनपासून पॅटर्नपर्यंत अनेक गोष्टींमध्ये मोठे बदल केले आहेत.