अमेरिकन बहुराष्ट्रीय गुंतवणूक बँक आणि वित्तीय सेवा कंपनी असलेल्या मॉर्गन स्टॅन्ले यांनी एक अहवाल प्रसिद्ध केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत १० वर्षांपूर्वीच्या तुलनेत खूप बदलला आहे. भारत जागतिक क्रमवारीत स्थान मिळवत आहे, आशिया आणि जागतिक विकासासाठी एक प्रमुख देश बनला आहे, असंही मॉर्गन स्टॅन्लेच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. अनेक लोक भारतावर टीका करतायत, कारण भारताने गेल्या २५ वर्षांत दुसऱ्या क्रमांकाची सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून आणि शेअर बाजारातील वेगवान व्यापार करूनही त्याच्या क्षमतेनुसार कामगिरी केला नसल्याचा त्यांचा आरोप आहे. खरं तर मॉर्गन स्टॅन्ले यांनीही आपल्या अहवालात भारतावर झालेल्या सर्वच आरोप आणि टीका फेटाळून लावल्यात.

एका दशकापेक्षा कमी कालावधीत भारत बदलला

आजचा भारत २०१३ पेक्षा वेगळा आहे. भारताने एका दशकापेक्षा कमी कालावधीत परिवर्तन केले आहे, मॅक्रो आणि बाजाराच्या दृष्टिकोनासाठी महत्त्वपूर्ण सकारात्मक परिणामांसह १० वर्षांच्या अल्प कालावधीत जागतिक व्यवस्थेत आपले स्थान निर्माण केले आहे. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून पंतप्रधान मोदींनी २०१४ पासून १० मोठे बदल केले आहेत. कॉर्पोरेट कर आणि पायाभूत गुंतवणूक ही सर्वात मोठी पुरवठा साइड धोरण सुधारणांपैकी एक असल्याचे मॉर्गन स्टॅन्लेने आपल्या अहवालात म्हटले आहे. देशात जीएसटी संकलन वाढले आहे, जी जीडीपीच्या टक्केवारीच्या रूपात डिजिटल व्यवहारांचा वाढता वाटा अर्थव्यवस्थेच्या वेगवान वाढीचे संकेत देते, असंही अहवालात म्हटले आहे. याशिवाय लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाचे पैसे थेट हस्तांतरित करणे, दिवाळखोरी आणि लवचिक महागाई लक्ष्यीकरण, एफडीआयवर लक्ष केंद्रित करणे, कॉर्पोरेट नफ्यासाठी सरकारी समर्थन, रिअल इस्टेट क्षेत्रासाठी नवीन कायदा हे बदल झाले आहेत.

हेही वाचाः Coin Vending Machines : प्रत्येक व्यक्तीला आता नवीन नाणे मिळणार; RBIने बँकांबरोबर मिळून बनवला प्लॅन

२०३१ पर्यंत भारताची निर्यात दुप्पट होणार

अहवालानुसार, देशातील उत्पादन आणि भांडवली खर्चातील स्थिर वाढीमुळे २०३१ पर्यंत जीडीपीमध्ये दोन्हीचा वाटा सुमारे ५ टक्क्यांपर्यंत वाढेल. याशिवाय वस्तू आणि सेवांच्या निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन भारताचा निर्यात बाजारातील हिस्सा २०३१ पर्यंत ४.५ टक्क्यांपर्यंत वाढेल, जो २०२१ च्या पातळीच्या जवळपास २ पट असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचाः Post Office TD : एकाच ठिकाणी १, २, ३ आणि ५ वर्षांची करता येणार FD; १० लाखांवर ४.५ लाखांपर्यंत फायदा